नागपूरः महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या सदोष असून यावर एकूण 485 नागरिकांनी आक्षेप नोंदविला. प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदविण्याचा शेवटचा दिवसापर्यंत आक्षेप नोंदविण्यात येत होते. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांना मतदार यादीही बघण्यासाठी मिळाली नाही. यादरम्यान अनेकांची नावे मतदार यादीतून गहाळ असून काहींची नावे दुसऱ्याच प्रभागाच्या मतदार यादीत आहे.


राज्यभरातील महानगरपालिकांनी तयार केलेल्या मतदार याद्यांमध्ये दोष आढळून आल्याने आता निवडणूक आयोगाला मतदार यादी प्रसिद्ध करणे, हरकत मागविणे, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमात बदल करावा लागला. सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. यावर 3 जुलैपर्यंत आक्षेप मागविण्यात आले होते. शहरातील 485 नागरिकांनी प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविले आहे. यात सर्वाधिक 117 आक्षेप आशीनगर झोनमध्ये तर सर्वात कमी 21 आक्षेप धरमपेठ झोनमध्ये नोंदविण्यात आले.


अनेक मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. अनेकांची नावे यादीतून गहाळ असल्याबाबतही काही मतदारांनी आक्षेप नोंदविले. या आक्षेपानुसार मतदार यादीत दुरुस्ती करण्यात येणार आहे. 9 जुलै रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहे.


झोननिहाय दाखल आक्षेप


लक्ष्मीनगर 24
धरमपेठ 21
हनुमाननगर 55
धंतोली 36
नेहरूनगर 15
गांधीबाग 51
सतरंजीपुरा 30
लकडगंज 58
आशीनगर 117
मंगळवारी 79


इतर महत्वाच्या बातम्या


Nagpur Schools : अनधिकृत शाळांवर कारवाई अटळ; शासनाकडे मागितले मार्गदर्शन


Politics : जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती, सरकारचे आदेश; नवीन पालकमंत्री घेणार निर्णय


Weekend Night : गिरनार फार्मवर सुरु असलेल्या 'ट्रॉपिकल अफेअर' पार्टीवर पोलिसांची धाड; मात्र शहरातील कल्बमधील पार्ट्या सुसाट


Maharashtra Rain : अतिवृष्टीतील मदत कार्यावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष,  NDRF च्या 9 तर SDRF च्या 4 टीम सज्ज


SpiceJet: तांत्रिक बिघाडामुळे भारतीय विमानाचं कराचीमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग, सर्व प्रवासी सुखरुप