नवी दिल्ली: दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईस जेटचे (SpiceJet SG-11) कराचीमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे या भारतीय विमानाचं इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आलं असून या विमानातील सर्व म्हणजे 150 प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती DGCA ने (Directorate General of Civil Aviation) दिली आहे. 


 






DGCA ने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान दिल्लीवरून दुबईला जात होतं. पण अचानक डाव्या बाजूच्या टँकमधील इंधन कमी असल्याचं अलार्म मिळाल्याने या विमानाचे इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आलं. या संबंधी कराची विमानतळाशी संपर्क केला आणि त्यानंतर हे लॅन्डिंग करण्यात आलं. नंतर निरीक्षण केल्यानंतर या टॅंकमध्ये कोणतेही लीक नसल्याचं स्पष्ट झालं. या विमानातील सर्व प्रवाशी सुखरुप असल्याची माहिती DGCA ने दिली आहे. 


विमानाचं सुरक्षित लॅन्डिंग 
स्पाईसजेटच्या प्रवक्ताने या बातमीवर खुलासा करताना सांगितलं की, या वेळी कोणत्याही इमर्जन्सी स्थिती जाहीर न करता ही लॅन्डिंग एखाद्या सामान्य परिस्थितीप्रमाणे करण्यात आली. विमानात अशा प्रकारची खराबी असेल अशी कोणतीही माहिती किंवा सूचना आधी देण्यात आली नव्हती. प्रवाशांची काळजी घेतली जात आहे. या प्रवाशांना दुबईपर्यंत नेण्यासाठी एका पर्यायी विमानाची सोय करण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: