नागपूरः जिल्ह्यातील 22 अनधिकृत शाळांना नोटीस बजावल्यानंतरही त्या बंद न केल्यामुळे संबंधित व्यवस्थापनांना दंडात्मक आणि फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक अनधिकृत शाळा हिंगणा तालुक्यातील आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009मधील कलम 18 नुसार कुठलेही व्यवस्थापन विनापरवानगी शाळा सुरू करू शकत नाही. अशा शाळा कलम 18 (5) नुसार कारवाईस पात्र आहे. अशा विनापरवानगी 22 शाळांची यादी शिक्षण विभागाने तयार केली आहे. या सर्व शाळांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. संबंधित अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास व्यवस्थापनास एक लाखांचा दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिवस 10 हजारांचा दंड ठोठाविण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये. त्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास ही जबाबदारी पालकांची राहील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
ग्रामीणमधील या शाळा अनधिकृत
विनापरवानगी सुरु असलेल्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये काटोल तालुक्यातील सनशाइन इंग्लिश मीडियम स्कूल पंचवटी, कामठी तालुक्यातील बुद्धिस्ट इंटरनॅश्नल स्कूल येरखेडा, त्रिमूर्ती पब्लिक कॉन्व्हेंट बाजारगाव, सिद्धिविनायक स्कूल बुटीबोरी, तथास्तु इंग्लिश स्कूल बेलतरोडी, न्यू प्रेरणा कॉन्व्हेंट टाकळघाट, ब्रिलियंट इंग्लिश स्कूल वानाडोंगरी, सार्थक इंग्लिश स्कूल राजीवनगर, एस.के. इंटरनॅशनल स्कूल इसासनी, क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले कॉन्व्हेंट सिर्सी, उमरेड यांचा समावेश आहे.
शहरातील या शाळा अनधिकृत
नागपूर शहर हद्दीतील अनधिकृत शाळांमध्ये एक्सल इंटरनॅश्नल स्कूल कळमना, दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल दाभा, दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल इंदोरा, मदर्स किड्स स्कूल बिनाकी, एलिझाबेथ कॉन्व्हेंट सेमिनरी हिल्स, दार-ए-मदिना इंग्लिश स्कूल शांतिनगर, मदरसा दारुलम तजुलवरा गर्ल्स गांधीबाग, मदरसा दारुलम तजुलवरा बॉईज गांधीबाग, न्यू रहेमानिया इंग्लिश प्रायमरी स्कूील मोमीनपुरा याचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Vidarbha rainfall : विदर्भातील शेतकरी सुखावला, जुलैच्या पावसाने भरुन काढली जूनची तूट
Politics : जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती, सरकारचे आदेश; नवीन पालकमंत्री घेणार निर्णय
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI