Job Majha : रयत शिक्षण संस्था सातारा, देवगिरी कॉलेज औरंगाबाद, श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ आणि इंडियन लॉ सोसायटी पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता, कार्यशाळा अधीक्षक आणि ग्रंथपालसह विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
रयत शिक्षण संस्था, सातारा
पोस्ट : प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता, कार्यशाळा अधीक्षक, ग्रंथपाल
शैक्षणिक पात्रता : सरकारमान्य शैक्षणिक पात्रता
एकूण जागा : 85
नोकरीचं ठिकाण : सातारा
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 जुलै 2022
तपशील : rayatshikshan.edu (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये engineering college walk in interview यावर क्लिक करा. detailed advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ
पोस्ट : वैद्यकीय अधिकारी, आवासी, सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : MBBS
एकूण जागा : 38
नोकरीचं ठिकाण : यवतमाळ
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2022
तपशील :- www.vngmcytl.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर vacancy/ recruiter मध्य़े तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
देवगिरी कॉलेज, औरंगाबाद
पोस्ट : सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : M.A., Ph.D/ NET/ SET
एकूण जागा : 211
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 9 जुलै 2022
तपशील : deogiricollege.org (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या recruitment 2022-23 यावर क्लिक करा. online application for recruitment यावर क्लिक करा. advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
इंडियन लॉ सोसायटी पुणे
पोस्ट : ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : ग्रंथपाल म्हणजे लायब्रेरियनसाठी M.Lib सह NET/SET, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पदव्युत्तर पदवी
एकूण जागा : 42
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 10 जुलै 2022
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
तपशील : ilslaw.edu (या वेबसाईटवर गेल्यावर announcement मध्ये advertisement for various posts librarian & assistant professor या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)