एक्स्प्लोर

Disha Salian Case-Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी ड्रिंक करुन ते कृत्य केलं असं मला खोटं लिहायला सांगितलं, अनिल देशमुखांच्या पुस्तकात खळबळजनक दावा

Disha Salian Case-Aaditya Thackeray: माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी त्यांच्या डायरी ऑफ ए होम मिनिस्टर या पुस्तकात दिशा सालियन प्रकरणावरुन खळबळजनक दावा केला आहे.

Disha Salian Case & Aaditya Thackeray: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी (Disha Salian Case) नव्यानं चौकशीसाठी दिशाचे वडील सतीश सालियन यांची हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. सतीश सालियन (Disha Salian Case Father Satish Salian) यांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), सूरज पांचोली, दिनो मोर्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिशा तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती, ती अशी आत्महत्या करणंच शक्य नाही. माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळी भासवण्यात आलं. मात्र तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलीय, असं सतीश सालियन यांनी याचिकेत म्हटलं आहे. दरम्यान माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी त्यांच्या डायरी ऑफ ए होम मिनिस्टर या पुस्तकात दिशा सालियन प्रकरणावरुन खळबळजनक दावा केला आहे.

अनिल देशमुखांच्या पुस्तकात खळबळजनक दावा-

दिशा सालियान प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या डायरी ऑफ ए होम मिनिस्टर राजकीय षडयंत्र उलथवून टाकणाऱ्या गृहमंत्र्यांची आत्मकथा या पुस्तकात मांडला आहे. मला या प्रतिज्ञापत्रात असं काही खोटं लिहायला सांगण्यात आलं होतं, जेणेकरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि मंत्री आदित्य ठाकरे हे दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणात अडकतील. त्यासाठी मला या प्रतिज्ञापत्रात खोटंच असं लिहायला सांगण्यात आलं की- पोलिसांकडून मला (म्हणजे गृहमंत्र्यांना) मिळालेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूतची आधीची मॅनेजर दिशा सालियनच्या पार्टीला आदित्य ठाकरे गेले होते. तिथे आदित्य यांनी ड्रिंक घेतल्यावर दिशा सालियनवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने आरडाओरड करायला सुरुवात केल्यावर आदित्य ठाकरे यांनी तिला बाल्कनीतून खाली फेकलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असं मला खोटं लिहायला सांगितलं होतं, असा खळबळजनक दावा अनिल देशमुखांच्या पुस्तकात केला आहे. 

रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरेंनी 44 वेळा फोनवर बोलणं केल्याचाही आरोप-

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार 8 जून 2020 च्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती. मात्र अचानक तिथं आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक, सूरज पांचोली, दिनो मोर्या ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला. या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणारं होतं म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं, असंही सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. सदर घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरीष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले. या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी वरीष्ठ पोलीस अधिका-यांशी फोनवरून सतत संपर्कात होते. याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोनकॉल्स केले. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांतसिंह राजपूत याचाही मृत्यू झाला.  याच कालावधीत रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरेंनी 44 वेळा फोनवर बोलणं केल्याचाही आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे. दिशाचा मृतदेह बंद दाराआडून हलवून तो बाहेर फेकण्यात आला. तिन 14 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केलाचा दावा केली गेला. मात्र दिशाच्या मृतदेहावर घटनेशी साधर्म्य दाखवणा-या कुठल्याही खुणा नव्हत्या. गँगरेपच्या खुणा मिटवण्यासाठीच मुंबई पोलीसांनी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात 50 तासांचा उशिर केला, असंही यातिकेत म्हटलं आहे.

एनआयए किंवा सीबीआय मार्फत कोर्टाच्या देखरेखीखाली सर्व तपास करावा- 

दिशाचा मृतदेहदेखील आम्हाला फारकाळ ठेवू दिला नाही, घाईघाईत त्याचे अंतिमसंस्कार करण्यास भाग पाडण्यात आलं. घटनेच्या दिवशीचं त्या इमारतीचं आणि आसपासच्या परिसराचं सीसीटिव्ही फुटेज रहस्यमरित्या गायब करण्यात आलं. तिथे असलेल्या अनेकांचं मोबाईल लोकेशन, सीडीआर यांची नोंदच घेतली गेली नाही, असा धक्कादायक दावाही सतीश सालियन यांनी याचिकेतून केला आहे. सदर सर्व माहिती असुनही राज्याचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही, उलट घडलेली घटना, संबंधित व्यक्त आणि भ्रष्ट अधिका-यांना पाठीशा घातलं. त्यामुळे त्यांचीही याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, असंही सतीश सालियन यांनी याचिकेतून म्हटलं आहे.आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टर्स यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी झाली पाहिजे. या सर्वांची नार्को टेस्ट, ब्रेन मैपिंग आणि लाय डिटेक्टर चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी देखील याचिकेतून केली आहे. सदर प्रकरणी विशेष सरकारी वकिल नेमून त्यांच्या देखरेखीखाली भक्कम केस तयार करावी. एनआयए किंवा सीबीआय मार्फत कोर्टाच्या देखरेखीखाली हा सर्व तपास करावा, असंही सतीश सालियन यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेतून म्हटलं आहे.

संबंधित बातमी:

Disha Salian Death Case: दिशा सालियनच्या मृत्यूच्यावेळी आदित्य ठाकरे कुठे होते?; तीन वर्षांआधी समोर आली होती महत्वाची माहिती

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंचे तिला 44 कॉल, मृतदेह गॅलरीतून कसा फेकला? दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत काय काय?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Embed widget