धुळे : खरीप हंगामाच्या (Kharip Season) पार्श्वभूमीवर झालेली बियाण्यांच्या दरातील वाढ आणि वजनात झालेली घट यामुळे शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Thackeray Camp) पक्षाच्या युवासेना कार्यकारणी सदस्य प्रियंका जोशी (Priyanka Joshi) यांनी जिल्हा प्रशासनासह राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे .


याबाबतचे पत्र प्रियंका जोशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पाठवले आहे. या सोबतच या प्रश्नावर राज्य सरकारला (Maharashtra Government) जाग यावी, यासाठी पोस्टाद्वारे अलार्म पाठवून प्रियंका जोशी यांनी लक्ष वेधले आहे. 


शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ 


गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी (Farmers) दुष्काळ, बे मोसमी पाऊस, अशा विविध संकटांनी हैराण झाला आहे. त्यातच सोयाबीन कपाशीचे भाव कमी झाले आहे, अशा विविध समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असून यंदा बियाण्याचे भाव वाढले आहे. तर उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  


पोस्टाने अलार्म पाठवत वेधले लक्ष


ही समस्या लक्षात घेता शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेना कार्यकारणी सदस्य प्रियंका जोशी यांनी जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. तसेच राज्य सरकारला जाग यावी, यासाठी पोस्टाने अलार्म देखील पाठविण्यात आला आहे. प्रियंका जोशी यांनी अनोखे आंदोलन करत राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या 


Akola News : शेतकर्‍यांची भन्नाट कल्पना; ड्रायवरशिवाय ट्रॅक्टर करतंय शेतात सोयाबीन अन् तुरीची पेरणी, राज्यातला पहिलाच प्रयोग


Bhandara News : शेतकऱ्यांना सलग तिसऱ्यांदा दिलासा; धान, मका खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ