Agriculture News Akola : भारतीय शेती नवतंत्रज्ञानामुळे कात टाकून पाहतीये. त्याच अनुषंगाने शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग केले जात आहेत. अशातच अकोला (Akola) जिल्ह्यात तंत्रज्ञानस्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केलाय. अकोल्यातील राजू वरोकार आणि त्यांच्या कुटूंबियांनी ‘जीपीएस कनेक्ट’ या सॉफ्टवेअरच्या (GPS Connect Software) माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी केलीये. जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातला हा  पहिल्यांदाच केलेला वापर असल्याचा दावा वरोकार कुटूंबियांनी केलाय. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेत सरळ पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरत असल्याचे ते म्हणालेय. पाहूयात, कसं आहे हे विनाचालक ट्रॅक्टरद्वारे पेरणी करणारं ऑटो पायलट सोईंग टेक्नॉलॉजी मशीन.  


ड्रायवरशिवाय ट्रॅक्टर करतंय शेतात सोयाबीन अन् तुरीची पेरणी


कधीकाळी पेरणी म्हटलं की, मोठी लगबग असायची. बैलं, तिफन, तिफनमागे पेरणासाठी लागणारी  माणसं आणि आणखी खुप मोठा लवाजमा. मात्र काळाने आता कृषी क्षेत्रातही क्रांती केलीय. बैलजोडी, तिफन जाऊन ट्रॅक्टर आणि पेरणीयंत्र आलं. परंतू, तंत्रज्ञानातील प्रगतीनंतरही ट्रॅक्टर चालवायला चालक हा लागत होता. मात्र, आता तंत्रज्ञान याही टप्प्याच्या पुढे गेलंय आणि आता विनाचालक ट्रॅक्टरच शेतात काम करू लागले आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात स्टेअरींगचे आपोआप फिरणे हे कदाचित कोणती जादू वाटेल. मात्र, हे शक्य झालंय ते ऑटो पायलट सोईंग टेक्नॉलॉजी मूळे. अकोल्यातील वरोकार या शेतकरी कुटूंबानं आपल्या शेतात हा प्रयोग केलाय. विजयेंद्र आणि राजू वरोकार असे हे तंत्रज्ञान वापरणार्‍या अकोला येथील शेतकऱ्यांचे नाव आहे.  


राज्यातला पहिलाच प्रयोग


या तंत्रज्ञानात शेतात ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी चालकाची गरज नाहीये. शिवाय पेरणीही अगदी सरळ होते. यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचे आर्टीके उपकरण लावण्यात आले आहे. हे उपकरण शेताच्या एका बाजूला ठेवावे लागतेय. तर जीपीएस कनेक्टद्वारे ते उपकरण ट्रॅक्टरशी जोडले जात असतं. अशी माहिती अभियंता आणि अभ्यासक आशिष हांडे यांनी दिली. आर्टीके हे उपकरण ट्रॅक्टरमधील उपकरणासोबत जोडलं जातं. हे उपकरण जर्मन बनावटीचे आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना  4. 5 ते 5 लाख रूपये इतका खर्च येतोये. पुढील काळात या प्रयोगाद्वारे अधिकाधिक शेतकरी अशी यांत्रिक पेरणी करण्यासाठी कृषी विभाग आता पुढाकार घेणार असल्याची महिती अकोला येथील आत्मा या कृषी विभागाचे  प्रकल्प संचालक मुरली इंगळे यांनी दिली. 


भारतीय शेतीनं आता मळलेल्या वाटा सोडत नव तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. यात नव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय शेतीला नवं रूपडं प्राप्त होऊ शकतं. अकोल्यातील जीपीएसचा वापर करीत पुढे ऑटो पायलट सोईंग तंत्रज्ञान याच बदलांची नांदी म्हणता येईल. अशी भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केलीय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


अकोल्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पठार नदीला पूर, पनोरी आणि जणोरी गावांचा संपर्क तुटला