Dhule News : धुळे (Dhule) येथील लळींगच्या निसर्गरम्य कुराणात वसलेला लांडोर बंगला (Landor Bangalow) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अखंड स्मृती तेवत उभा आहे. या ठिकाणी बाबासाहेब तीन दिवस मुक्कामी होते. या ऐतिहासिक प्रसंगाला यंदा 86 वर्ष पूर्ण होत असून दरवर्षी 31 जुलैला भीम स्मृती यात्रा भरवली जाते. त्यातून आठवणींना उजाळा दिला जातो. राज्यभरातून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी अस्पृश्य समाज व देशासाठी दिलेल्या भरीव योगदानात एक सुवर्णपान खानदेशाच्या वाट्याला आलेलं आहे. त्यापैकीच एक पान म्हणजे धुळ्याजवळील लांडोर बंगला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका खटल्यानिमित्त 1937 मध्ये धुळ्यातील शिरपूरला (Shirpur) आले होते. या खटल्यानंतर त्यांनी धुळ्यात तीन दिवस मुक्काम केला होता.त्यावेळी धुळ्यातील संदेशभूमी येथील भाषण आणि लळींग किल्ल्याजवळील लांडोर बंगल्यावर मुक्काम, त्यामुळे या दोन्ही वास्तू आजही ऐतिहासिक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे आज आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले. 


गेल्या 32 वर्षांपासून बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो आंबेडकरी (Dr. Ambedkar) अनुयायी येत असतात. सालाबादाप्रमाणे यंदाही हजारो आंबेडकरी अनुयायांनी लांडोर बंगला येथे गर्दी केली होती. या ठिकाणी आंबेडकरी अनुयायांकडून भीम स्मृती यात्रेचे आयोजन केले जातं. यावेळी परिसरात विविध सामाजिक उपक्रम तसेच प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवशी लांडोर बंगल्यावर बुद्ध वंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येते. त्यानंतर बस स्थानकाशेजारील संदेश भूमी येथे अभिवादनाचा कार्यक्रम झाल्यानंतर अनुयायी बंगल्याकडे रवाना होतात. त्यानंतर बंगला परिसरात मोठ्या उत्साहात भीमस्मृति यात्रा आयोजित करण्यात येते. दरवर्षी 31 जुलै रोजी धुळे, जळगाव, नंदुरबार,नाशिकसह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून देखील नागरिक अभिवादन करण्यासाठी येत असतात. 
 


धुळे दौऱ्याचं निमित्त काय?


'पोळा सणात कोणाचा बैल पुढे असावा' या वादावरून धुळे जिल्ह्यातील शिरपूर न्यायालयात दाखल केलेले याचिकेवर युक्तिवाद करण्यासाठी पी.ए. तवंग यांचे वकील या नात्याने खटला चालवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईहून धुळ्याला आले होते. शिरपूर येथील न्यायालयीन कामकाज पार पडल्यानंतर त्यांनी धुळ्यात संदेशभूमी येथे पहिले भाषण केले. नंतर धुळ्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा लळींग येथील विश्वासू सहकारी पुनाजी लळींगकर यांच्यासोबत ते लांडोर बंगल्यावर तीन दिवस मुक्कामी राहिले.


इतर महत्वाच्या बातम्या :