Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची आज जयंती आहे. त्यांची जयंती (Ambedkar Jayanti 2023) आज देशभरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर भाष्य करणारे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात 'भीम गर्जना', 'डॉ. आंबेडकर', 'बोले इंडिया जय भीम' अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. आज 'भीम जयंती'निमित्त त्यांच्यांशी संबंधित असलेल्या सिनेमांबद्दल जाणून घ्या...


1. भीम गर्जना (Bhim Garjna) 


'भीम गर्जना' हा सिनेमा 1990 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा विजय पवार यांनी सांभाळली होती. या सिनेमात कृष्णानंद यांनी बाबासाहेबांची भूमिका साकारली होती. 'भीम गर्जना' हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेला पहिला सिनेमा आहे. 


2. युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Yugpurush Dr. Babasaheb Ambedkar) 


'युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर' हा सिनेमा 1993 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन शशिकांत नलावडे यांनी केलं होतं. या सिनेमात नारायण दुलाके यांनी बाबासाहेबांची भूमिका साकारली होती. या सिनेमातील गाणी शाहीर साबळेंनी गायली आहेत. 


3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर - द अनटोल्ड ट्रुथ (Dr. Babasaheb Ambedkar - The Untold Truth) 


'डॉ. बाबासाबेह आंबेडकर - द अनटोल्ड ट्रुथ' हा इंग्लिश सिनेमा 2000 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाचं दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केलं असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मामुट्टीने साकारली होती. या सिनेमात सोनाली कुलकर्णी आणि मृणाल कुलकर्णीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. 


4. बोले इंडिया जय भीम (Bole India Jai Bhim)


'बोले इंडिया जय भीम' हा सिनेमा 7 ऑक्टोबर 2016 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. सुबोध नागदेवे दिग्दर्शित या सिनेमात श्याम भीमरारिया यांनी आंबेडकरांची भूमिका साकारली होती. बेला शेंडेने या सिनेमातील गाणी गायली आहेत. 


5. बाळ भिमराव (Bal Bhimrao) 


'बाळ भिमराव' हा सिनेमा 9 मार्च 2018 रोजी प्रदर्शित झाला. प्रकाश जाधव यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सिनेमात मनीष कांबळे या बालकलाकाराने आंबेडकरांची भूमिका साकारली होती. हा सिनेमा आंबेडकरांच्या बालपणीच्या आयुष्यावर आधारित आहे. 


6. डॉ. आंबेडकर (Dr. Ambedkar) 


'डॉ. आंबेडकर' ही मालिका 1992-93 साली डीडी नॅशनलवर प्रसारित व्हायची. या हिंदी मालिकेत मराठमोळे अभिनेते सुधीर कुलकर्णी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारली होती. आजही ही मालिका प्रेक्षक युट्यूबवर पाहू शकतात. 


7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा (Dr. Babasaheb Ambedkar - Mahamanvachi Gauravgatha)


'डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा' ही मालिका स्टार प्रवाहवर दाखवली जायची. या मालिकेत सागर देशमुखने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारली होती. ही मालिका भारतासह परदेशातदेखील पाहिली गेली आहे. 


8. बालक आंबेडकर (Balak Ambedkar) 


'बालक आंबेडकर' हा सिनेमा 1991 साली प्रदर्शित झालेला कन्नड सिनेमा आहे. बसवराज केस्थर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा बाबासाहेबांच्या बालपणीच्या आयुष्यावर आधारित आहे. 


संबंधित बातम्या


Ambedkar Jayanti 2023 : भीम जयंतीला वाजवा 'ही' खास गीतं; "भीमराव एक नंबर" ते "लई मजबूत भिमाचा किल्ला"