Dhule News : धुळे (Dhule) शहरापासून काही किलोमीटर अंतरावर डिझेलचा टँकर (Diesel Tanker) भररस्त्यात उलटला. डिझेलचा टँकर उलटल्याने संपूर्ण डिझेल रस्त्यावर सांडलं आहे. हे डिझेल पाहुन रस्त्यावरील नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली. पलटी झालेल्या डिझेलच्या टँकरमधून पडणारे डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. मिळेल त्या भांड्यात आणि कॅनमध्ये परिसरातील नागरिकांनी डिझेल भरून नेण्यास सुरुवात केली.


चंद्रपूरच्या (Chandrapur) दिशेने जात असताना मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) डिझेलने भरलेल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मुंबई आग्रा महामार्गावर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा डिझेल टँकर उलटल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत टँकर चालक गंभीर जखमी झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर अग्निशमन विभागाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच उपस्थित नागरिकांना बाजूला करत मोठी दुर्घटना टाळण्यासाठी आपले कार्य सुरु केले आहे.


या अपघातामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही जण गेले. त्यांनी वाहतूक सुरळीत करून सदर टँकर हा एका बाजूला लावला. मात्र डिझेल टँकर उलटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आजुबाजुंच्या अनेक नागरिकांनी धाव घेतली. अनेक जणांनी टँकरमधून बाहेर पडत असलेल्या डिसेलला भांड्यात भरत होते. कुणी पातेले, कुणी ड्रम तर कुणी बादल्या डिझेल पळविण्यासाठी घेऊन आल्याचे व्हिडिओतुन दिसते आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भीडल्या आहेत. महागाईने त्रस्त झालेल्या काही नागरिकांनी हे डिझेल मिळेल त्या भांड्यात भरण्यास सुरुवात केली आहे. याचे काही व्हिडिओ देखील समोर आले असून हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.


डिझेल पळविण्यासाठी गर्दी 


दरम्यान डिझेल टँकर उलटल्याची बातमी धुळे शहरात पसरली. आजूबाजूच्या नागरिकांसह असंख्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कुणी ड्रम, तर कुणी कॅन तर कुणी डबे घेऊन पळत होते. टँकर उलटलेल्या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत होते. डिझेल पळवण्यासाठी जणू स्पर्धा लागली होती. प्रत्येकजण आपापली भांडी भरण्यात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यातच काहींनी तर अक्षरशः वाहून जाणारे मातीमिश्रित डिझेल भरुन नेले. विशेष म्हणजे अगदी लहानग्यापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच जास्तीचे तेल आपल्या भांड्यात कसे पडेल, यासाठी कसरत करत होते. याचवेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलच्या कॅमऱ्यात कैद केला. 


इतर संबंधित बातम्या : 


Jalgaon News : तेलाचा टँकर उलटला अन् उडाली एकच झुंबड, लोकांनी डबे अन् पातेले भरभरून तेल पळवलं!