Dhule Lok Sabha 2024 धुळे : आगामी लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Elections 2024) आगामी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) जागा वाटपावरून चर्चा सुरु आहे. धुळे लोकसभा (Dhule Lok Sabha Constituency) निवडणुकीची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार अशी चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीत धुळ्याची जागा नक्की कोणाच्या वाटेला येणार याबाबत आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी वक्तव्य केले आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला जाणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी करून अद्यापही जागा वाटपाच्या संदर्भात ठोस निर्णय झालेला नाही. धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा सक्षम उमेदवार अभावी काँग्रेस ऐवजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जाण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 


भाजपाची यादी जाहीर झाल्यानंतर निर्णय घेणार


याबाबत बोलताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की,भाजपाची (BJP) यादी जाहीर झाल्यानंतर त्या ताकदीचा उमेदवार इंडिया आघाडीकडून दिला जाईल तो कोणत्या पक्षाचा असेल हे नंतर ठरेल, शिवसेनेकडून याबाबतचा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. 


इंडिया आघाडीचा उमेदवार विजयी कसा होईल हे आमच्यासाठी महत्त्वाचं


जागा निश्चित नाही किंवा उमेदवार नाही असे नसून अत्यंत विचारपूर्वक याबाबतचा निर्णय इंडिया आघाडीकडून घेतला जात आहे. भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीकडून सक्षम उमेदवार दिला जाईल.  महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक एक दिलाने लढत असून कोणत्या पक्षाला जागा सुटते हे आमच्यासाठी महत्त्वाचे नसून इंडिया आघाडीचा उमेदवार विजयी कसा होईल हे आमच्यासाठी महत्त्वाचे असेल.  मात्र याबाबत शिवसेनेकडून तसा प्रस्ताव आल्यास आम्ही निश्चित त्यावर विचार करू अशी प्रतिक्रिया कुणाल पाटील यांनी व्यक्त केली आहे. यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघाची (Dhule Lok Sabha Constituency) जागा काँग्रेसची (Congress) की शिवसेना ठाकरे गटाची (Shiv Sena UBT) हे अजूनही अनुत्तरीत आहे. धुळे लोकसभेची जागा नक्की कुणाच्या वाटेला येणार? याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे. 


आणखी वाचा


Dindori Lok Sabha 2024 : दिंडोरी लोकसभेवर भाजप, राष्ट्रवादीचा दावा; महायुतीत मिठाचा खडा?


Manoj Jarange Patil: देवेंद्र फडणवीस सर्वात मोठी चूक करतायत, त्यांच्यामुळे मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार: मनोज जरांगे पाटील