धुळे : शिवसेना आणि भाजपसाठी आस्थेचा विषय म्हणजे औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतराचा विषय. औरंगाबादचे नामांतर आता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) असं करण्यात आलं असून त्याचं स्वागत सर्वांनीच केलं. पण या नामांतराच्या श्रेयवादात आघाडी घेणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या धुळ्यातील पदाधिकाऱ्यांना मात्र नेमकं कोणत्या शहराचं नामांतर झालंय याबाबत काहीसा संभ्रम दिसतोय. त्याचमुळे त्यांनी दिशाफलकावरील दौलताबाद (Daulatabad) हे नाव खोडून त्यावर छत्रपती संभाजीनगर नावाचे स्टिकर लावले आणि आपलं अज्ञान उघडं पाडलं. धुळ्यातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या या कारनाम्याची चर्चा सध्या चांगलीच सुरू आहे. 


नावासाठी आंदोलन केलं, पण चुकीच्या ठिकाणी स्टिकर लावलं


धुळे शहरातील चाळीसगाव चौफुलीवर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर लहान-सहान गावांचा उल्लेख करण्यात आलेला होता. परंतु छत्रपती संभाजीनगरचे नाव त्यातून वगळण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. अखेर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतिश महाले यांनी या ठिकाणी समर्थकांसह आंदोलन केले. 


क्रेनच्या साहाय्याने या फलकावर असलेल्या दौलताबादच्या नावावर 'छत्रपती संभाजीनगर'च्या नावाचे स्टिकर लावले. मात्र दौलताबादचे नाव बदलण्यात आलेले नसताना देखील त्यावर संभाजीनगर हे नाव लावण्यात आल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे अज्ञान समोर आल्याची चर्चा यावेळी दबक्या आवाजात सुरू होती.


धुळे विधानसभा क्षेत्रात आमदार फारुख शाह यांच्या निधीतून दिशादर्शक फलक लावले जात आहेत. यात चाळीसगाव चौफुलीवर छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गावरही फलक लावण्यात आला आहे. या फलकावर छोट्या छोट्या खेडे गावांची नावे घेण्यात आली. मात्र छत्रपती संभाजीनगर हे नाव वगळले. 


पदाधिकाऱ्यांचे अज्ञान आणि नागरिकांमध्ये संभ्रम


या दिशादर्शक फलकावर वेरूळ, दौलताबादची नावे लावण्यात आली आहेत. मात्र संभाजीनगरचे नाव लावण्यात न आल्याने शिवसेनेचा शिंदे गट आक्रमक झाला होता. शुक्रवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या फलकावर छत्रपती संभाजीनगरचे नाव लावले. मात्र दौलताबादचे नाव बदललेले नसतानादेखील त्यांनी दौलताबादचे नाव खोडून त्यावर संभाजीनगर हे नाव लावल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.


राज्य शासनाने औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असं केलं आहे. मात्र दौलताबादचे नाव बदललेले नसताना देखील त्यावर संभाजीनगर हे नाव लावण्यात आल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाचे अज्ञान समोर आल्याची चर्चा यावेळी दबक्या आवाजात सुरू होती.


ही बातमी वाचा: