एक्स्प्लोर

Dhule : धुळ्याच्या शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई! 12 तलवारींसह मोठा शस्त्रसाठा जप्त 

Dhule Crime News : धुळ्यातील शिरपूर पोलिसांनी 12 तलवारींसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली आहे.

Dhule Crime News : इंदुरहून धुळ्याकडे धारदार शस्त्र घेऊन जाणाऱ्या आरोपींना शिरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी 12 तलवारीसह इतर शस्त्र आणि एक मारुती कंपनीची इर्टिका गाडी असा सुमारे 6 लाख 29 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही धारदार शस्त्रे राजस्थान राज्यातून महाराष्ट्रात आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे.   

धुळे तालुक्यातील शिरपूर तालुका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका पांढऱ्या रंगाच्या इर्टिका गाडी ( क्रमांक MH 04 FZ 2004 ) मधून काही संशयित इंदुरकडून धुळ्याकडे हत्यारे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्यासह पथकाने हाडाखेड सीमा तपासणी नाका येथे नाकाबंदी केली. यावेळी संशयित गाडी नाक्यावर आल्यानंतर तिची तपासणी केली असता या वाहनात तब्बल 12 तलवारी, दोन गुप्ती, एक चोपर, एक बटनाचा चाकू आणि दोन फायटर असा शस्त्रसाठा मिळून आला आहे.

याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसांनी सतपाल गिरधर सोनवणे, किरण नंदलाल दुधेकर, विकास देवा ठाकरे, सखाराम रामा पवार, सचिन राजेंद्र सोनवणे, राजू अशोक पवार, विशाल विजय ठाकरे, संतोष नामदेव पाटील, अमोल शांताराम चव्हाण आणि विठ्ठल सोनवणे  ( सर्व राहणार धुळे तालुका) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक वातावरण चांगलेच ढवळले असून गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने सोनगीर जवळ तब्बल 90 तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या. 

शिरपूर तालुका पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या तलवारी नेमक्या कुठून आणि कोणत्या उद्देशाने जात होत्या याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. मात्र अवघ्या वर्षभराच्या आतच तलवारी जप्त करण्याची ही तिसरी घटना असून यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. 

दरम्यान, धुळे पोलिसांनी मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात मुंबई आग्रा महामार्गावरील जालन्याकडे जाणाऱ्या रोडवर सोनगीर पोलिस ठाण्याच्या 500 मीटर अंतरावर पांढऱ्या रंगाच्या स्कार्पियोमधून तब्बल 89 तलवारी आणी एक खंजीर जप्त केला होता. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी वेगात जात असलेल्या स्कार्पिओला हात दाखवून थांबण्याचा इशारा केला होता.  मात्र, चालकाने गाडी अधिक वेगात पळवल्याने पोलिसांना संशय आल्याने पाठलाग करून पोलिसांनी गाडी अडवली होती. यावेळी गाडीत तब्बल 89 तलवारी आणि एक खंजीर आढळून आला होता. या घटनेला एक वर्ष उलटण्याआधीच आता 12 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या 

बँक लिपिकाचा कारनामा, व्यवस्थापकाच्या खात्यावरील 75 लाख रूपये घेतले स्वत:च्या खात्यावर  

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget