Dhule Accident: एका विचित्र अपघातानं धुळ्यात (Dhule Crime News) खळबळ उडाली आहे. धुळ्यात (Dhule News) एका टँकर चालकानं अनेक वाहानांना उडवलं आहे. या अपघातात (Accident News) काही वाहन चालक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. टँकर गुजरातकडे (Gujrat) जात असताना त्यानं अनेक वाहानांना धडक दिली. मद्यपी टँकर चालक राजेंद्र सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शहरातील संतोषी माता चौक ते फाशीदपूर दरम्यान ही घटना घडली आहे. नेमके किती लोक जखमी झाले आहेत? याचा  पोलिसांकडून शोध सुरू आहे. 


धुळे शहरातील बारा पत्थर, संतोषी माता चौक ते फाशीपूल दरम्यान भरधाव वेगानं जाणाऱ्या टँकरनं अनेक वाहानांना धडक दिली. गुजरातच्या दिशेनं निघालेल्या या टँकरमध्ये केमिकल होते. केमिकलनं भरलेल्या याच टँकरनं अनेक वाहानांना धडक दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केमिकलनं भरलेला जो टँकर सर्व वाहानांना उडवत भरधाव वेगानं पुढे जात होता, त्या टँकरचा चालक नशेत होता. सदर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून राजेंद्रसिंह सकट असं टँकर चालकाचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. नेमकं किती लोक या हिट अँड रन घटनेत जखमी झाले आहेत, याचा पोलीससांकडून शोध सुरू आहे. 


धुळ्यातील धक्कादाय हिट अँड रनची घटना साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनं धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे जिल्हा पोलीस दलानं तात्काळ घटनास्थळी नाव घेत जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं आहे. अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालय येथे जखमींची पाहणी केली आणि कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन नागरिकांना केलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Dhule Accident: धुळ्यात थरार! केमिकल भरलेल्या टँकरनं अनेक वाहनांना उडवलं, चालक नशेत, काही जण जखमी