Dhule Accident: धुळ्यात थरार! केमिकल भरलेल्या टँकरनं अनेक वाहनांना उडवलं, चालक नशेत, काही जण जखमी
धुळे शहरातील बारा पत्थर, संतोषी माता चौक ते फाशीपूल दरम्यान भरधाव वेगाने गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या केमिकलने भरलेल्या टँकरने अनेक वाहनांना धडक दिली .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटँकर चालक हा नशेमध्ये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
सदर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून राजेंद्रसिंग सकट असे टँकर चालकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नेमकं किती लोक या घटनेत जखमी झाले आहेत याचा पोलीससांकडून शोध सुरू आहे.
ही घटना साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडल्याने धुळे शहरात या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे
घटनेची माहिती मिळतात धुळे जिल्हा पोलीस दलाने तात्काळ घटनास्थळी नाव घेत जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालय येथे जखमींची पाहणी केली
कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन धुळेकर नागरिकांना केले.