धुळे:  धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका (सांगवी) पोलिसांनी शिरपूर तालुक्यातील भोईटी शिवारात पाठलाग करत कारमधून गावठी कट्टे घेऊन जाणाऱ्या तरूणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेले तरुण हे नाशिक येथील असून ते उच्चभ्रू कुटुंबातील आहेत. वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकणारे हे तरुण असून डिप्लोमा, बीबीए, कॉमर्स आणि कला शाखेचे आहे.  या विद्यार्थ्यांनी हौस म्हणून पिस्तूल खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


हे तरूण नाशिक येथील महाविद्यालयातील असल्याची माहिती समोर आली आहे.  विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या सहापैकी पाच तरुण हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असून उच्चभ्रू कुटुंबातील आहेत. डिप्लोमा, बीबीए, वाणिज्य आणि कला शाखेच्या या विद्यार्थ्यांनी मजा म्हणून पिस्तूल खरेदी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून कारसह तीन कट्टे, सहा जिवंत काडतुसासह पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने  ही कारवाई केली. शिरपूर तालुक्यातील भोईटी गावाजवळ या तरुणांना ताब्यात घेण्यात आले


पोलीसांनी पकडलेल्या तरूणांमध्ये मोहीतराम तेजवानी (वय 21, रा. पलंटनं. 10 विंग गोदावरी कॉम्प्लेक्स चिंचबनरोड पंचवटी, नाशिक), आकाश विलास जाधव, (वय 24 रा. रूम नं. 15 देह मंदिर सोसायटी विसे चोक, गंगापुर रोड नाशिक), राज प्रल्हाद मंदोरिया (वय 21 रा. प्लॉट नं. 6 आजाड निवास मधुबन कॉलनी पंचवटी नाशिक), अजय जेठा बोरीस (वय 29 रा. रूम नं. 6 चैतन्य हौसिंग सोसायटी रामवाडी पंचवटी, नाशिक), निवास सुरेंद्र कानडे, (रा. 24 (ब) दिव्य दर्शन सोसायटी, विसे मळा कॉलेज रोड नाशिक) व दर्शन चमनलाल सिधी (वय 21 रा. अजंदे बुद्रुक ता. शिरपुर) अशी या तरुणाची नावे आहेत. मध्यप्रदेशातील उंबरठी गावातून पिस्तूल खरेदी केल्याचा या कारवाईतून समोर आले आहे.  कारवाईनंतर पोलिसांनी नाशिक येथील पोलीस आयुक्तालयात पत्र दिले आहे.  


पिस्तूल प्रेमामुळे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये गावठी पिस्तूल, कट्टे बनवण्याचे कारखाने उभे राहिले आहेत. या कारखान्यांमधून दरवर्षी लाखभराहून अधिक पिस्तूल, बंदुका तयार होतात. त्यांची विक्री देशभरात होत असते.   अनेर राज्यांमध्ये पिस्तूल तयार करणारे कारखाने आहेत. तेथील अनेकांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. या व्यवसायांना स्थानिक पोलिसांचा वरदहस्त असल्याने हे सुरू आहे. या कारखानदारांकडून पोलिसांना रितसर हप्ते सुरू असल्याचे वारंवार तपासात निष्पन्न झाले आहे. गावठी पिस्तूलच्या व्यवसायाला चाप कधी बसणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :