Nagpur Crime News : नुकताच पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात गुन्हेगाराला (Nagpur Criminal) त्याचाच साथीदार असलेल्या गुंडाने मित्रांच्या मदतीने संपवले. ही थरारक घटना अजनीतील पार्वतीनगर परिसरात घडली. मृत आणि आरोपी दोघेही 2013 साली केलेल्या एका खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. तीन आठवड्यांपूर्वी दोघेही पॅरोलवर बाहेर आले होते.


विक्की उर्फ रितेश जयसिंग चंदेल (वय 28, रा. न्यू मनिषनगर) असे मृताचे तर राकेश पाली (वय 29 रा.पार्वतीनगर), शुभम कोकस (वय 20), सोमु पाली, लाल्या पाली, दिलीप अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की चंदेल हा 24 डिसेंबरला 28 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. तसेच आरोपी राकेश हा सुद्धा 30 डिसेंबरला 28 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता.


प्राप्त माहितीनुसार रात्री अकराच्या सुमारा विक्की हा प्रेयसी सरिता खोब्रागडे (वय 28, रा. खलासी लाईन मोहननगर सदर) हिच्यासोबत फिरत होता. दरम्यान तो नरेंद्रनगर येथी पानठेल्यावर आला. सिगारेट घेत असताना त्याचा राकेश पाली याचा भाचा शुभम कोकस याच्याशी वाद झाला. त्यातून त्याने शुभमल जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शुभमने पानठेला बंद करत 'हिंमत असल्यास घराकडे ये, तुला बघून घेईल' अशी धमकी दिली. त्यामुळे रागात असलेल्या विक्कीने आपल्या प्रेयसीसह त्याचा पाठलाग केला. दोघेही शुभमच्या पार्वतीनगर येथील घराजवळ पोहचले. तिथे शुभमने त्याचा मामा राकेश पाली याला सर्व प्रकरण सांगितले. त्यामुळे राकेश पाली, सोमु पाली, संजय पाली आणि लाल्या पाली यांनी एकत्र येत, विक्कीवर हल्ला चढवला. कुऱ्हाड, रॉड आणि लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. विक्कीच्या प्रेयसीने पळ काढत अजनी पोलीस स्टेशन गाठून ही संपूर्ण माहिती दिली. 


चौघांना अटक अन् मुख्य आरोपी फरार


पोलिसांनी (Nagpur Police) गुन्हा दाखल करत, सोमु पाली, संजय पाली आणि लाल्या पाली यांना अटक केली. मात्र, प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश पाली अद्याप फरार आहे. दोघेही एकाच खुनात आरोपी आहे. विक्कीसह राकेश पाली आणि संजय वाघाडे या तिघांनी मिळून 2013 साली आशिष बुधवावरे नामक व्यक्तीचा अजनी चौकात खून केला होता. या प्रकरणात धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यातून ते मध्यवर्ती कारागृह येथे शिक्षा भोगत होते. त्यापैकी विक्की चंदेल तर राकेश पाली 28 दिवसांच्या पॅरोलला बाहेर आले होते.


ही बातमी देखील वाचा...


नागपूर जिल्ह्यातील एक हजार कोटींच्या विकासकामांचा मार्ग मोकळा; डीपीसी बैठकीला निवडणूक आयोगाची मंजुरी