Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पोस्टमधून चक्क 'दादा'चं गायब, अजित पवारांच्या जागी मोदींचा फोटो
एकीकडे मी महायुतीचा उमेदवार असल्यानं राष्ट्रवादी पक्ष का वाढवू असं अर्चना पाटील याचं वक्तव्य व्हायरल होतं असताना, आता दूसरीकडे त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमधून अजित पवार गायब झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
Lok Sabha Election 2024 : धाराशीव लोकसभा मतदारसंघातून (Dharashiv Lok Sabha Constituency) भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्या पत्नी अर्चना पाटील (Archana Patil) यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) उमेदवारी देण्यात आलीय. राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण, ज्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली त्याच राष्ट्रवादी पक्षाचा आणि नेत्यांचा अर्चना पाटील यांना विसर पडला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाला मी का वाढवू असे म्हणणाऱ्या अर्चना पाटील यांच्या सोशल मीडियावर (Social Media) टाकण्यात आलेला पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
धाराशीव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांना आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा विसर पडला असल्याची चर्चा आहे. अर्चना पाटील यांच्या सोशल मीडियातील पोस्टरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांचा फोटो न टाकता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) फोटो टाकण्यात आला आहे. त्यांच्या पोस्टरवर घड्याळाचे चिन्ह आहे, माञ फोटो नरेंद्र मोदी यांचा टाकण्यात आला आहे. एकीकडे मी महायुतीचा उमेदवार (Mahayuti Candidate) असल्यानं राष्ट्रवादी पक्ष का वाढवू असं अर्चना पाटील याचं वक्तव्य व्हायरल होतं असताना, आता दूसरीकडे त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमधून (Social Media Posts) अजित पवार गायब झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
आधी म्हणल्या मी कशाला राष्ट्रवादी वाढवू...
धाराशीव लोकसभा मतदारसंघातून अर्चना पाटील यांना अजित पवार गटाकडून महायुतीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती भाजपचे आमदार आहेत. तर, उमेदवारी जाहीर झाल्यावर अर्चना पाटील मतदारसंघाचा दौरा करत आहे. याचवेळी त्यांनी प्रचारानिमित्त बार्शीचा दौरा केला. बार्शीत आलेल्या अर्चना पाटील यांना पत्रकारांनी तुम्ही बार्शीत राष्ट्रवादी वाढवणार का? असा प्रश्न विचारला असता, मी कशाला राष्ट्रवादी वाढवू असं वक्तव्य त्यांनी केले. ज्या पक्षातून उमेदवारी घेतली आहे तोच पक्ष कशाला वाढवू असं त्यांनी म्हटल्याने अनेकांना धक्काच बसला. अशात आता त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये अजित पवारांच्या जागी मोदींचा फोटो पाहायला मिळाला.
इतर महत्वाच्या बातम्या :