(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मागण्या पूर्ण करा नाहीतर...; पहाटेपासून टॉवरवर चढून एसटी कर्मचाऱ्याचं आंदोलन, मुख्यमंत्री कार्यालयाकडून संपर्काचा प्रयत्न
धाराशिव जिल्ह्यातील कळंब आगारातील कर्मचारी सच्चिदानंद पुरी शहरातील बीएसएनएलच्या 200 फुट उंच टॉवरवर चढून बसले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Dharashiv News : धाराशिवमधील (Dharashiv) कळंबमध्ये एसटी कर्मचारी सच्चिदानंद पुरी यांनी आत्महत्येचा इशारा दिल्यामुळे खळबळ माजली आहे. मोबाईल टॉवरवर चढून पुरी यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पुरी यांच्या आंदोलनामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. पुरी जवळपास आठ तासांपासून आंदोलन करत आहेत. सकाळपासून ते टॉवरवर चढून बसलेले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब आगारातील कर्मचारी सच्चिदानंद पुरी शहरातील बीएसएनएलच्या 200 फुट उंच टॉवरवर चढून बसले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पुरी सकाळपासून टॅावरवर चढून बसले आहेत. सव्वा वर्ष आंदोलन करुन 124 कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावून ही एसटी कर्मचाऱ्यांचे विलनीकरण झाले नाही. म्हणून सच्चिदानंद पुरी हे सकाळीच बीएसएनएल टॉवरवर चढून स्वतःच्या गळ्याला गळफास लावून बसले आहेत. त्यांनी तसा व्हिडीओही व्हायरल करुन नंतर हे पाऊल उचलले आहे. सच्चिदानंद पुरी हे टॉवरवर चढल्यानंतर अग्निशामक दलाची गाडी, पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी पोहोचले आहे. पुरी यांना खाली उतरवण्याची विनंती प्रशासनातील अधिकारी करत असले तरी सच्चिदानंद पुरी यांनी आपल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय खाली उतरणारच नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे.
एसटी महामंडळाचा कर्मचारी असलेले सच्चिदानंद पुरी हे सध्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातल्या एका मोबाईल टॉवरवर गळ्यात गळफास घेऊन बसला आहे. आज सकाळी त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह करत ही माहिती दिली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. एसटी महामंडळ कर्मचारी अंतर्गत असलेल्या संघटनेच्या नेत्यांमुळे प्रश्न सुटले नाहीत, असं पुरी या व्हिडीओत सांगत आहेत.
मुख्यमंत्री कार्यलयाकडून सच्चिदानंद पुरी यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न -
सकाळपासून सच्चिदानंद पुरी यांनी टॉवरवर चढून आंदोलन पुकारले आहे. मुख्यमंत्र्यांनी लेखी पत्र दिल्याशिवाय खाली उतरणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. कळंबचे तहसीलदार व एसटी आगाराचे विभागीय अधिकारी या पुरी यांना टॉवरवरून खाली उतरण्याची वारंवार विनंती करत आहे. त्यांच्या या विनंतीला तो कसलाही प्रतिसाद देत नाही. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी कळंब एसटी आगारातील वाहक सच्चिदानंद पुरी हे सकाळी साडेपाच वाजता गळ्याला गळफास लावून कळंब येथील बीएसएनएल टॉवरवर अडीचशे फुटावर जाऊन बसले आहेत. मागणी मान्य झाली नाही तर जीवन संपवणार असा व्हिडिओ त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सच्चिदानंद पुरी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र थेट मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागं घेणार नसल्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत.
मागण्यांसाठी सकाळपासून पुरी यांचं आंदोलन
एसटी महामंडळाचा कर्मचारी असलेला सच्चिदानंद पुरी हा सध्या धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब शहरातल्या एका मोबाईल टॉवरवर गळ्यात गळफास घेऊन बसला आहे. आज सकाळी त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह करत ही माहिती दिली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. एसटी महामंडळ कर्मचारी अंतर्गत असलेल्या संघटनेच्या नेत्यांमुळे प्रश्न सुटलेले नाहीत, असं पुरी या व्हिडीओत सांगत आहेत. आपण आत्महत्या करणार आहोत, असं या व्हिडीओमध्ये पुरीने सांगितलं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर त्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना अटक करुन गिरगाव कोर्टात आणले होते. त्या वेळेला ही सच्चिदानंद पुरी यांनी तिथून फेसबुक लाईव्ह केले होते. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होते.