Dharashiv Lok Sabha Constituency : धाराशिव लोकसभा मतदार संघाचे (Dharashiv Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यासह महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांना निवडणूक आयोगाकडून (Election Commission) नोटीस (Notice) पाठवण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही नोटीस काढली आहे. 


धाराशिव लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि महायुतीकडून (Mahayuti) भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjit Singh Patil) यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यात लढत होणार आहे. या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत दोन्ही उमेदवारांना नोटीस धाडली आहे.


...म्हणून पाठवली निवडणूक आयोगाने नोटीस


ओमराजे निंबाळकर यांनी एका सभेत बोलताना तेरणा हॉस्पिटलने रुग्णावर उपचार करण्यासाठी सरकारकडून 18 कोटी रुपये घेतले असा आरोप राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केला होता. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेल्या प्रचार सभेत अर्चना पाटील यांनी 500-1000 रुपये देऊन गर्दी जमा केल्याची तक्रारही ओमराजे निंबाळकर केली होती. हा आरोप चुकीचा असल्याचे सांगत अर्चना पाटील यांनी ओमराजेंची तक्रार केली होती. 


सबळ पुरावे तात्काळ सादर करण्याचे आदेश


या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी नोटीस जारी केली आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या अनुषंगाने सबळ पुरावे तात्काळ सादर करण्याचे आदेश त्यांनी ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आले आहेत.


निंबाळकरांच्या आरोपांवर राणा जगजितसिंह पाटलांचे प्रत्युत्तर


ओमराजे निंबाळकर यांच्या आरोपानंतर राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. विरोधक खासदार हा बोलबच्चन आहे. अत्यंत खोटरडे चुकीचे आरोप करत आहे. खासदाराने असे चुकीचे आरोप करु नयेत अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल. त्यांनी पुरावे द्यावेत, दोषी असल्यास राजकरण सोडून देईल. आपण प्रामाणिकपणे रुग्णसेवा करतो. पैशात मोजण्याचा हा विषय नाही. मात्र, विरोधक यामध्ये राजकारण करत आहेत. अर्धवट माहिती देऊन दिशाभूल करण्याची वृत्ती विरोधकांची असल्याचे त्यांनी म्हटले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


'ओमदादा जिगर का तुकडा'; लाडक्या दादासाठी आदित्य ठाकरे धाराशिवमध्ये, ओमराजेंचा अर्ज भरला


Omraje nimbalkar on Malhar Patil : रक्तात राष्ट्रवादी, ह्रदयात भाजप आहे, आता किडनीत शिंदे गट टाक, ओमराजेंचा मल्हार पाटलांवर हल्लाबोल