Ranajagjitsinha Patil : विरोधक खासदार हा बोलबच्चन आहे. अत्यंत खोटरडे चुकीचे आरोप करत आहे. खासदाराने असे चुकीचे आरोप करु नयेत अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल, असा भाजप आमदार राणा जगितसिंह पाटील (Rana Jagjit Singh Patil) यांनी ओमराजे निंबाळकरांना (Omraje Nimbalkar) दिला. नवी मंबईतील तेरणा मेडिकल- रुग्णालयातील उपचारावरुन ओमराजेंनी केलेल्या टिकेला राणा जगजितसिंह पाटील प्रतिउत्तर दिले. खोटे नाटे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. त्यांनी पुरावे द्यावेत, दोषी असल्यास राजकरण सोडून देईल असेही राणा जगजितसिंह पाटील म्हणाले. 


ओमराजे निंबळकर हे एक नंबरचे खोटारडे


विरोधक खासदार (ओमराजे निंबाळकर) हा एक नंबरचा खोटारडा आहे. धाराशिवमध्ये मेडीकल कॉलेज मंजूर झालं आणि येथील कॉलेज दुसरीकडं नेलं असं जर झालं असेल तर खासदाराने एकतरी पुरावा द्यावा, मी राजकारण सोडून देईन असेही पाटील म्हणाले. आपण प्रामाणिकपणे रुग्णसेवा करतो. पैशामध्ये मोजण्याचा हा विषय नाही. मात्र, विरोधक यामध्ये राजकारण करत आहेत. खोटी, अर्धवट माहिती द्यायची दिशाभूव करायची अशी वृत्ती विरोधकांची असल्याचे पाटील म्हणाले. खोटं बोलण्याचा प्रकार आता महायुती एकूण घेणार नाही. ही निवडणूक केलेल्या विकासाच्या कामांची पाहिजे. मात्र, विरोधी खासदारांचे शून्य काम आहे. खोट बोलणं आणि नाटकी बोलणं त्यांच सुरु असल्याचे पाटील म्हणाले.


धाराशिव लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण गरम


सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यानिमित्त सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केलीय. या प्रचारात राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव लोकसभा मतदारसंघातही राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातून महाविका आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. तर दुसऱ्या बाजूने भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या निवडणूक लढवत आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित वार गटाकडून तिकीट देण्यात आलं आहे. कारण महायुतीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला सुटली होती. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. धाराविव लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी मतदान होणार आहे.  


महत्वाच्या बातम्या:


एका बाजूला राणा जगजितसिंह तर दुसऱ्या बाजूला ओमराजे, दोन्ही नेते थेट शेतकऱ्यांचा बांधावर