Omprakash Rajenimbalkar on Malhar Patil, Barshi : "पद्मसिंह पाटलांचं कुटुंब बार्शीत आलं. त्यांना विचारलं गेल की, तुम्ही आता राष्ट्रवादीत आलात. राष्ट्रवादी वाढवणार का? तर म्हणाल्या कशाला काय करु मी, माझा नवरा भाजपमध्ये आहे. अजित पवारांनी यांचे बोलणे ऐकून कपाळाला हात लावला असेल. हे कमी होतं म्हणून दुसऱ्या दिवशी मल्हार पाटील (Malhar Patil) आला. म्हणाला रक्तात राष्ट्रवादी आहे. ह्रदयात भाजप आहे. मी म्हणालो आता किडनीत शिंदे गट टाक," असं उस्मानाबाद लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) म्हणाले.  माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी बार्शीत लोकसभा निवडणुकीबाबत मेळावा आयोजित केला होता. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर बोलत होते. 


बळीचे बकरे अगोदरच सोबत घेतले होते


ओमराजे निंबाळकर म्हणाले, मी शब्दाचा पक्का आहे. एकदा का शब्द दिला तर जीव गेला तर बेहत्तर पण शब्द माघारी फिरवत नाही. माझ्याविरोधात 2 डझन नाव चर्चेत होते. रोज नवीन उमेदवाराच्या चर्चा होत्या. भारतीय जनता पार्टी हुशार आहे. त्यांना माहिती होती धाराशिवमध्ये काटा निघणार आहे. पण त्यांनी बळीचे बकरे अगोदरच सोबत घेतले होते. काय काटा निघायचाय ते त्यांचाच निघू देत म्हणाले. त्यानंतर उमेदवार जाहीर झाला. 


राणा पाटलांना वर्गात मॉनिटर केलं नसेल


पुढे बोलताना निंबाळकर म्हणाले, आता प्रचाराची दिशा ठरलीये. धाराशिवची लढाई पद्मसिंह पाटील कुटुंब विरुद्ध पवनराजे निंबाळकर कुटुंब आहे. उघड आहे. झाकून नाही. बार्शीतील लोकांना माहिती नसेल. पद्मसिंह पाटील धाराशिव 40 वर्ष मंत्री होती. त्यानंतर राणा पाटलांना वर्गात मॉनिटर केलं नसेल पण शरद पवारांनी यांना मंत्री केलं. यांना एकूण 45 वर्ष मंत्रीपद मिळालं. एवढे वर्ष जिल्ह्याचे नेतृत्व केलं,  यांनी साध्य काय केल? धाराशिव जिल्हा दारिद्र्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला. पद्मसिंह पाटील यांनी 2009 मध्ये श्रीमंत खासदारांपैकी क्रमांक 3 चे खासदार होते. 


कमळाबाईला विकास जमला नाही


45 वर्षे सत्ता भोगून एका रात्रीत हे कुटुंब कमळाबाईकडे गेलं. कमळाबाईला विकास जमला नाही, म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे आली. 45 वर्ष मंत्री देऊनही शरद पवारांशी गद्दारी केली. मला पलीकडे गेलो तर 50 खोके मिळत होते. पण 50 खोक्यांवर लाथ मारुन मी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभा राहिलो, असंही ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ranjeetsinha Naik-Nimbalkar : काही लोक न बोलावतात जातात, तर काही जण मुद्दाम बोलावतात, शरद पवारांच्या अकलूज दौऱ्यावर निंबाळकरांचा हल्लाबोल