धाराशिव : तुळजापूरच्या (Tuljapur) श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात काल भेंडोळी उत्सव संपन्न झाला. या उत्सवानिमित्त मातेच्या मंदिरातून पेटवलेली भेंडोळीचे दर्शन घेण्यासाठी आणि हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.दरवर्षी दिवाळीतील अमावस्यानिमित्त ही भेंडोळी काढण्यात येते. देशभरात दोन ठिकाणी 'भेंडोळी' उत्सव साजरा केला जातो. उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये हा उत्सव साजरा केला जातो.
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात अश्विन अमावस्येला भेंडोळी उत्सव साजरा केला जातो. काळभैरवनाथ हा देवीचा रखवालदार आहे आणि त्याची फिरणं रात्रीचं असतं त्याला उजेड हवा म्हणून हा भेंडोळी उत्सव असल्याची अशी आख्यायिका आहे. काळभैरवनाथ आला काशीचा कोतवाल म्हटलं जाते. त्याची मंदिरे भारतात सर्वत्र असली तरी भेंडोळी उत्सव उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तुळजापूर येथेच फक्त साजरा होतो. आगीच्या ज्वालासह एका छोट्याशा रस्त्यातून भेंडोळी घेऊन देवीच्या मंदिरात जाणं हा एक थरारक अनुभव असतो. भेंडोळी प्रज्वलनानंतर कालभैरव मंदिरापासून श्रीतुळजाभवानी देवीच्या मंदिरात आणली जाते. नंतर देवीला पदस्पर्श करून मंदिराला प्रदक्षिणा करून वेशीबाहेर आणून भेंडोळी विझवली जाते.
भेंडोळी काय आहे ?
भेंडोळी म्हणजे एका अकरा फूट लांब व साधारण सात ते आठ इंच जाडीच्या काठीला (दांड) मधोमध कच्च्या केळीचा अखंड घड बांधला जातो. नंतर संपूर्ण दांडावर केळीच्या खोडाचे जे साल गुंडाळतात नंतर चिंचेच्या झाडाच्या छोट्या छोट्या फांद्यांचा एक थर संपूर्ण दांडावर लावला जातो. यावर आंबड्याच्या झाडाची साल व पीळ घातलेल्या दोरीचा वापर करून सर्व बांधणी झाल्यानंतर एका लोखंडी साखळदंडामध्ये सुती कपड्याचे पलिते तेलामध्ये बुडवून ओवले जातात. भेंडोळीची संपूर्ण बांधणी तयारी व भेंडोळी प्रज्वलन श्री काळभैरव मंदिराच्या समोर केली जाते.
उत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
दिपावलीच्या अमावस्येला काळभैरवाचा भेंडोळी उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. काल रात्री काळभैरव मंदिरातुन ही भेंडोळी तुळजा भवानीच्या मंदिरात आणली गेली. देवी भेट झाल्यानंतर मंदिरात प्रदिक्षणा घातली जाते. नंतर कमान वेस येथे मारुती मंदिरात भेंडोळी विझवली जाते. हा उत्सव पाहण्यासाठी स्थानिक व बाहेरचे भाविक मोठया संख्येने उपस्थित असतात.
हे ही वाचा :
Muhurat Trading Time And Date : गुंतवणूकदारांने मुहूर्त ट्रेडिंगसाठी राहा तयार! जाणून घ्या ट्रेडिंगचा नेमका वेळ काय?