एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी ओबीसी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी; देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वातंत्र सेनानींचा अपमान

Chhatrapati Sambhajinagar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात आहे. यावेळी ओबीसी कार्यकत्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलाय.

Devendra Fadnavis छत्रपती संभाजीनगर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. दरम्यान या कार्यक्रमातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी काहीसा गोंधळ उडाल्याचे बघायला मिळाले. यावेळी काही ओबीसी कार्यकत्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलाय. मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना अटक करून ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील 3 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी काही हलगर्जीपणा केला असेल तर त्यांची चौकशी करू. तसेच अधिकारी यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे बंजारा समाजाला हैदराबाद गाजिटेर लागू करावं, या मागणीसाठी रवींद्र पवार यांनी सिद्धार्थ उद्यानासमोर आत्महत दहन करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे. पवार नामक या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मी फार काही बोलणार नाही, ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे. आज आपण मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम करतोय. अशा कार्यक्रमांमध्ये काही लोक येतात आणि नारेबाजी करतात हा खऱ्या अर्थाने मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सेनानींचा मोठा अपमान आहे. केवळ प्रसिद्धीसाठी हे केलं जातंय. त्यावर मी फार काही बोलणार नाही. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर दिली.

कोण आहेत ते आंदोलनकर्ते

1) रामभाऊ कोंडाजी पेरकर (70 वर्ष, धंदा समाजसेवक, शेती) राहणार . बंजरग चौक छत्रपती संभाजीनगर

हे छगन भुजबळ समर्थक असून OBC आरक्षण बचाव करिता काम करतात. यात प्रमुख रामभाउ पेरकर हे या पूर्वी बहुजन वंचित आघाडीचे काम करत होते. त्यानंतर समता परिषद व माळी संघटनेच्या माधयमातून काम करतात.

2) शिवाजी बाबुराव गाडेकर (वय 59 वर्ष, धंदा - नोकरी सेवा. राहणार मुकुंदनगर अंजली पुत्र हनुमान मंदिर छत्रपती संभाजीनगर मुकुंदवाडी पोलीस स्टेशन)

3 ) अशोक सिंग किसन सिंग शेवगण (वय 62 वर्ष धंदा शेती रा. एन सेवन पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे छत्रपती संभाजीनगर)

छगन भुजबळ झिंदाबादच्या दिल्या घोषणा

अटक करण्यात आलेले सगळे OBC समर्थक आहे. त्यांनी खालील घोषणा दिल्या 1) हैदराबाद गॅझेट रद्द झालेच पाहीजे

2) OBC चे आरक्षन धक्का देणारे युती सरकार मुरादाबाद

3) छगन भुजबळ झिंदाबाद अशा घोषणा दिल्यात.

मागण्या योग्य, पण आंदोलन करण्यासाठी हे व्यासपीठ योग्य नव्हतं- अंबादास दानवे

ओबीसी बांधवांनी केलेल्या मागण्या योग्य आहे. मात्र मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आंदोलन करण्यासाठी हे व्यासपीठ योग्य नव्हतं. यासाठी सर्वात जबाबदार अपयशी पोलीस यंत्रणा आहे. सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरली आहे. अशी प्रतिक्रिया उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

आणखी वाचा 

PM Modi Birthday: पंचाहत्तरी झाली पण भाजपचं नेतृत्व मोदींकडेच राहणार, फडणवीस-शिंदेंच्या 'त्या' कृतीमुळे स्पष्ट संकेत

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Pak : पाकिस्तानच्या जबड्यातून भारताने हिसकावला विजय; शेवटच्या क्षणी पलटला संपूर्ण सामना, नेमकं काय घडलं? पाक चारीमुंड्या चित
पाकिस्तानच्या जबड्यातून भारताने हिसकावला विजय; शेवटच्या क्षणी पलटला संपूर्ण सामना, नेमकं काय घडलं? पाक चारीमुंड्या चित
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget