एक्स्प्लोर

पीक कर्ज कसं मिळतं? त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती?

मुंबई: सध्या पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी काही शेतकरी जुन्या कर्जाची परतफेड करुन नवीन कर्जासाठी अर्ज करत आहेत. तर काही जुन्या कर्जाचं पुनर्गठण करुन घेत आहेत. मात्र कर्जाची ही प्रक्रिया अतिशय किचकट असल्याचा शेतकऱ्यांचा समज आहे. पीक कर्ज नेमकं मिळतं तरी कसं?   शेतकऱ्याला सेवा सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकाकडून पीककर्ज मिळतं. यासाठी बँकेचा खातेदार होणं गरजेचं आहे. जुने खातेदार थेट पीककर्जासाठी अर्ज करु शकतात. यासाठी तलाठ्याकडून काही कागदपत्रं मिळवावी लागतात.   पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रं *नमुना ८ अ उतारा *७-१२ उतारा *सोसायटीचा कर्ज नसलेला दाखल *परिसरातील बँकांचे कर्ज नसल्याचं प्रमाणपत्र (नो ड्युज सर्टिफिकेट) एक लाखापर्यंतच्या कर्जासाठी इतकी कागदपत्रं पुरेशी आहेत. त्यापेक्षा जास्त कर्ज हवं असल्यास, वरील कागदपत्रांसह पुढील कागदपत्रं आवश्यक आहेत. *शेतीचा नकाशा *बेबाकी/हैसियत प्रमाणपत्र (अन्य कोणत्या बँकेचं कर्ज नसल्याचा दाखला) *ओलीताचं प्रमाणपत्र *चतु:सीमा प्रमाणपत्र *कृषी उत्पन्नाचा दाखला   ही कागदपत्र विनामूल्य तलाठ्याकडून शेतकऱ्यांना मिळतात. याशिवाय शेतकऱ्यांना चार फोटोचीही गरज भासते.   दरवर्षी शेतीचा खर्च वाढत असतो. त्यामुळं दरवर्षी २० टक्के वाढीव पीककर्ज मिळतं. प्रत्येक पिकाला किती कर्ज द्यायचं याचे निकष ठरलेले असतात. कोरडवाहूला एकरी ८ हजार आणि ओलीताच्या शेतीला १६ हजाराचं पीककर्ज मिळतं. यंदा ज्या शेतकऱ्यांना जुनं पीककर्ज फेडता आलेलं नाही त्यांनी कर्जाचे हप्ते कमी करुन घेतले आहेत..तर ज्यांना तातडीचं कर्ज मिळवायचं आहे त्यांच्यासाठी कमी व्याजदरात सोने तारण कर्जाचा पर्याय उपलब्ध आहे.   यंदाच्या नवीन निर्णयानुसार शासनानं पीक कर्जावरील अडीच लाखांपर्यंत स्टँप ड्युटी माफ केली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना घेता येणार आहे. सोबत २०१५ नंतरच्या पीककर्जाचं पुनर्गठणही केलं जात आहे.   पीककर्ज घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी जुन्या कर्जाची परतफेड करुन नवीन कर्ज घेतली आहेत त्यांनी बँकेत कर्ज परतफेडीची नोंद झाली आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी, ७-१२ आणि ८ अ च्या उताऱ्यावर कर्जाची नोंद व्यवस्थित झाली की नाही हे तपासून पाहावं. बँक किंवा सोसायटीकडून घेतलेलं कर्ज आणि व्याजाची आकारणी याची आकडेवारी जुळते की नाही याचीही तपासणी करुन घ्यावी. पीक कर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण ७ ते ८ दिवसात पीक कर्ज मंजूर होतं. त्यामुळं शेतकऱ्याला सावकाराच्या पाशात अडकावं लागत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
मोठी बातमी! गव्हाच्या निर्यातीबाबत सरकारनं घेतला मोठा निर्णय, शेतकऱ्यांना फायदा मिळणार का? 
मोठी बातमी! गव्हाच्या निर्यातीबाबत सरकारनं घेतला मोठा निर्णय, शेतकऱ्यांना फायदा मिळणार का? 
आत्तापर्यंत राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला कर्जमाफीचा लाभ, कोणत्या विभागात किती? सविस्तर आकडेवारी समोर 
आत्तापर्यंत राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला कर्जमाफीचा लाभ, कोणत्या विभागात किती? सविस्तर आकडेवारी समोर 

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
Mhada Pune Lottery 2026 : गुड न्यूज, म्हाडाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 4462 घरांची लॉटरी जाहीर, घरांच्या किमती 13 लाखांपासून सुरु
पुण्यात घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्यांना सुवर्णसंधी, म्हाडाकडून 4462 घरांची लॉटरी जाहीर, 13 लाखांपासून घरांच्या किमती सुरु
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा
Abhijeet Dipke: 'विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक...' अभिजित दिपकेंचं देशातील सर्व शिक्षण मंत्र्यांना पत्र; शिक्षक भरती ते शाळांवर खर्च, सहा मुद्यांवर लक्ष वेधलं
'विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक...' अभिजित दिपकेंचं देशातील सर्व शिक्षण मंत्र्यांना पत्र; शिक्षक भरती ते शाळांवर खर्च, सहा मुद्यांवर लक्ष वेधलं
मोठी बातमी ! अहिल्यानगरमध्ये खासगी आरोग्य विद्यापीठ; मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय, खेळाडूंसाठी नवं बक्षिस धोरण
मोठी बातमी ! अहिल्यानगरमध्ये खासगी आरोग्य विद्यापीठ; मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय, खेळाडूंसाठी नवं बक्षिस धोरण
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोन्याच्या दरात 8 हजारांची वाढ, चांदी 10 हजारांनी महागली
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोन्याच्या दरात 8 हजारांची वाढ, चांदी 10 हजारांनी महागली
Embed widget