नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 17 मेनंतर लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. देशात 14 एप्रिलपासून काही ठिकाणी अटी-शर्तींसह लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. त्यामुळे देशांत अनेक गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. अशातच ऑनलाईन फूड डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थित काळजी घेऊन फूड डिलीवरी करण्यासाठी झोमॅटोलाही परवानगी देण्यात आली
आहे. अशातच झोमॅटो जवळपास 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.


Zomato ने शुक्रवारी सांगितलं की, 'कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जवळपास 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात येणार आहे. कंपनीत 4 हजार पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात.' यासंदर्भात अधिक माहिती देताना झोमॅटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी असे म्हटले की, 'गेल्या काही महिन्यांत कंपनीच्या व्यवसायाचे अनेक पैलू बदलले आहेत आणि यातील बरेच बदल कायमस्वरुपी होणार आहेत.'


दीपिंदर गोयल यांनी पुढे बोलताना सांगितले की, 'आमच्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रमाणात काम मिळेल याची खात्री वाटत नाही. त्यामुळे कंपनीतील 13 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातही कपात करण्यात येणार आहे. त्यांना 24 तासाच्या आतमध्ये कंपनीच्या नेतृत्व टीमकडून झूम कॉल कडून निमंत्रण दिले जाणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलेले नाही पण त्यांच्यासाठी कंपनीकडे काम नाही आहे अशांना फक्त 50 टक्के पगार देण्यात येणार आहे.' तसेच गोयल यांनी बोलताना सांगितले की, कर्मचाऱ्यांनी आपला पूर्ण वेळ आणि उर्जा नवी शोधण्यासाठी कामी लावावी. कंपनी जून महिन्यापासून सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करणार आहे.


दरम्यान, सध्याच्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अॅमेझॉन, डी-मार्ट, बिग बास्केट, ग्रोफर्स, फ्लिपकार्ट, झोमॅटो यांसारख्या कंपन्या घरपोच किराणा सामान पोहोचवत आहे. नागरिकांनी घरात राहावं त्यामुळे घरपोच सेवा देण्यासाठी अनेक कंपन्या पुढे आल्या आहेत. तसेच लॉकडाऊन-3 लागू केल्यानंतर महसूल मिळावा यासाठी सरकाने दारूची दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी दिली. मात्र लोकांना दारुच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्या आणि सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी केली. त्यामुळे अनेक ठिकाणी दारूची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. मात्र मद्यपींना दारूची होम डिलिव्हरी देण्याचा डिलिव्हरी अॅप झोमॅटो विचार करत आहे. देशभरातील दारूनची मागणी लक्षात घेत झोमॅटो याबाबत विचार करत आहे.


संबंधित बातम्या : 


चिमुरड्याला सुटकेसवर ठेवून ओढत असल्याचा व्हिडीओ व्हायरल, मानवाधिकार आयोगाची पंजाब, यूपी सरकारला नोटीस


अमेरिकी कंपनी ‘सिल्वर लेक’ची जिओमध्ये 5,656 कोटींची गुंतवणूक


Coronavirus | कोरोना विरूद्धच्या लढ्यासाठी RBI कर्मचाऱ्यांचा पुढाकार; 7.30 कोटी पीएम केअर फंडसाठी देणार