नवी दिल्ली : जिओ प्लॅटफॉर्म आणि फेसबुक डीलनंतर अवघ्या काही दिवसानंतर जिओ प्लॅटफॉर्मने आणखी एक मोठी डील जाहीर केली आहे. अमेरिकेच्या खाजगी इक्विटी कंपनी सिल्व्हरलेकने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 1 टक्क्यांहून अधिक हिस्सा विकत घेतला आहे. यासाठी सिल्व्हरलेकने रिलायन्स जिओमध्ये तब्बल 5,656 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
रिलायन्स जिओच्या सिल्वरलेकबरोबरची ही डील जिओच्या फेसबुक डीलपेक्षा जास्त प्रीमियमवर झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, जर तुम्ही सिल्व्हरलेक डीलनुसार रिलायन्स जिओचे मूल्य बघितले तर ते 65 अब्ज अरब डॉलर्स झाली आहे. फेसबुक डीलनुसार 12.5 टक्के प्रीमियमवर ही डील करण्यात आली आहे. या करारानंतर रिलायन्स जिओमधील सिल्वरलेकचा हिस्सा 1.15 टक्के झाला आहे.
22 एप्रिल रोजी फेसबुक आणि रिलायन्स जिओ करार
22 एप्रिल रोजी फेसबुकने रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममधील 9.99 टक्के भाग भांडवल 43,574 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. यानंतर रिलायन्स जिओच्या प्लॅटफॉर्मवर फेसबुकच्या सेवेचा करार झाला. ही भारतातील कंपनीत झालेली सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक होती आणि ही भारतातील सर्वात मोठी सोशल मीडिया डील आहे.
सिल्वर लेक फर्मची जगातील मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांसोबत भागीदारीचा शानदार रेकॉर्ड राहिलाय. टेक्नॉलॉजी आणि फायनान्समध्ये सिल्वर लेक कंपनी लोकप्रिय आहे. सिल्वर लेक टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बाबतीत ग्लोबल लीडर आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | कोरोना विरूद्धच्या लढ्यासाठी RBI कर्मचाऱ्यांचा पुढाकार; 7.30 कोटी पीएम केअर फंडसाठी देणार