एक्स्प्लोर
चायनीज खाद्यपदार्थाच्या गाडीवरुन वाद, नगरसेविकेच्या नातेवाईकांची दोघांना मारहाण
उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये चायनीज खाद्यपदार्थाची गाडी लावण्याच्या वादातून काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविकांच्या नातेवाईकांनी दोन भावांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. उल्हासनगरमधील कॅम्प 5 मध्ये ही घटना घडली आहे.
मानसिंग लबाना आणि सुनील सिंग लबाना यांच्या मच्छीमार्केटमधील खाद्यपदार्थाच्या गाडीला नवनिर्वाचित नगरसेविका पूजा कौर लबाना आणि त्यांच्या नातेवाईकांचा विरोध होता. आणि त्यातूनच नगरसेविकेच्या नातेवाईकांनी दोघांनाही मारहाण केली.
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकरणी पोलीस नेमकी कारवाई कधी करणार असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
भारत
नागपूर
Advertisement