एक्स्प्लोर

नाताळच्या सुट्ट्यामुळे चार लाख पर्यटक दाखल झाल्याने पंढरपूर ओव्हर पॅक, शिर्डीतही ख्रिसमसचे रंग

कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याने श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. नाताळच्या गर्दीच्या वेळी सकाळी तीन तास मंदिर बंद असल्याने गुरूवारी दुपारनंतरच दर्शनाचा लाभ भक्तांना घेता येणार आहे.

पंढरपूर : सध्या सुरु असलेल्या नाताळाच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूरमध्ये ओव्हर पॅक गर्दी सुरु आहे. या दहा दिवसात मंदिर समितीने ऑनलाईन आणि व्हिआयपी दर्शन पूर्णपणे बंद केल्याने देशभरातून आलेल्या पर्यटकांना विठुरायाच्या सुखकर दर्शनाचा आनंद घेता येत आहे. नाताळाच्या सुट्ट्यांमध्ये 8 ते 10 दिवस पंढरपूरमध्ये अशी गर्दी असते या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने गोपाळपूर पर्यंत तात्पुरती दर्शन रांग उभी केली असून या दर्शन रांगेत भाविकांना पिण्याच्या पाण्यासह सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. या सुट्ट्यात येणारे बहुतांश पर्यटक हे शहरी भागातून येत असून सध्याच्या प्रचंड गर्दीमुळे 10 दिवस ऑनलाईन दर्शन सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. याचसोबत दर्शनासाठी घुसखोरी करणाऱ्या तथाकथित व्हिआयपी देखील रांगेतून दर्शन घ्यावे लागत असल्याने पर्यटकातून समाधान व्यक्त होत आहे. आज पंढरपूर शहर शहरी पर्यटकांमुळे यात्रेसारखे फुलले असून पंजाब, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक , गुजरात सह देशाच्या विविध भागातून जवळपास 4 लाख पर्यटक दाखल झाले आहेत. उद्या सूर्यग्रहण असाकल्याने मंदिराने विठुरायाच्या नित्योपचारात बदल केले असले तरी याचा पर्यटकांच्या संख्येवर कोणताही परिणाम झालेला नाही. सध्या विठ्ठल दर्शनाची रांग थेट चंद्रभागा घाटापर्यंत पोचली असून देवाच्या पायावरील दर्शनाला 5 ते 6 तास एवढा वेळ लागत आहे. शहरात प्रशासनाने उभारलेले सर्व वाहनतळ वाहनांनी भरून गेले असून अशीच अवस्था शहरातील हॉटेल आणि लॉजेसमध्ये दिसू लागली आहे. शिर्डीतही नाताळचे रंग देशभरात ख्रिसमस सणाची धूम सुरू असताना नाताळचे रंग आज शिर्डीतही बघायला मिळाले. अनेक साईभक्तांनी सांताक्लाॅजच्या टोप्या घालून साईदर्शन घेतल्याने ख्रिसमसचे रंग शिर्डीतही बघायला मिळाले. आज नाताळच्या निमित्ताने अनेक चर्चमध्ये गर्दी दिसत असताना शिर्डीतही भाविकांनी साईदर्शनला हजेरी लावली. सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या मंदिरात प्रत्येक सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. साई बाबांवर प्रत्येक धर्मातील लोकांची श्रद्धा असून अनेकजण शिर्डीत येऊन साईदर्शन घेऊन आपला उत्सव साजरा करत असतात. दरम्यान आज पासून नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत शिर्डीत साईभक्त मोठ्या संख्येने हजेरी लावणार असून साई संस्थान साईभक्तांच्या सुविधेसाठी सज्ज झालं आहे. 31 डिसेंबरला होणारी गर्दी लक्षात घेता साई समाधी मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंकणाकृती सूर्यग्रहणामुळे साई मंदिर तीन तास बंद उद्या, गुरुवारी कंकणाकृती सुर्यग्रहणाच्या दिवशी शिर्डी साईबाबा समाधी मंदिराच्‍या दैनंदिन कार्यक्रमांच्‍या वेळेत बदल करण्‍यात आला आहे. गुरुवार 26 डिसेंबर रोजी सकाळी 8.05 ते सकाळी 11 याकाळात कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याने श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. नाताळच्या गर्दीच्या वेळी सकाळी तीन तास मंदिर बंद असल्याने गुरूवारी दुपारनंतरच दर्शनाचा लाभ भक्तांना घेता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Waist to Hip Ratio: वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Share Market : अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
Supreme Court on Delhi Police: 'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
Embed widget