ABP Majha Impact : रद्द झालेल्या महाभरती परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळणार; 'एबीपी माझा'च्या बातमीचा दणका
Zilla Parishad Bharti Fees : सरकारकडून 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क त्यांना परत मिळणार आहे.
औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून, 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी (Zilla Parishad Bharti) भरलेले शुल्क परत मिळणार आहे. त्यामुळे त्यावेळी शुल्क भरलेले एकूण 21 कोटी 67 लाख रुपये विद्यार्थ्यांना परत मिळणार असून, याबाबतीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे याबाबत 7 ऑगस्ट रोजी 'एबीपी माझा'ने वृत्त दाखवले होते. तर, 'एबीपी माझा'च्या वृत्ताची दखल घेत आता सरकारकडून 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी विध्यार्थ्यांनी भरलेले शुल्क त्यांना परत मिळणार आहे.
काय आहे प्रकरण?
राज्य सरकारने जिल्हा परिषदांमधील विविध 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च 2019 आणि ऑगस्ट 2021 मध्ये महाभरतीची घोषणा करत याची प्रकिया देखील सुरु केली होती. त्यामुळे या दोन्ही जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी यासाठी परीक्षा शुल्कासह उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्याने ही महाभरती रद्द करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी कोट्यवधी रुपये परीक्षा शुल्काचे सरकारच्या तिजोरीत जमा झाले होते. पण भरती रद्द होऊन देखील परीक्षा शुल्क अद्यापही अर्जदार विद्यार्थ्यांना परत मिळालेले नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाचे वृत्त 'एबीपी माझा'ने दाखवले होते.
ऑनलाईन पद्धतीने पैसे परत केले जाणार...
दरम्यान, 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी भरलेले शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आले होते. ज्यात प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंद आहे. त्यामुळे पैसे परत करण्यासाठी कोणतेही अडचण येणार नाही. मात्र, काही विध्यार्थ्यांनी सायबर कॅफेमधून अर्ज भरल्याने संबंधित कॅफे चालकांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. पण अशा सर्व विद्यार्थ्यांची माहिती मागवून, त्यांना देखील पैसे परत करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी सांगितले आहेत. त्यामुळे 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी भरलेले शुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
2019-21 मधील परीक्षेची आकडेवारी...
- जिल्हा परिषदा संख्या : 34
- खुल्या वर्गासाठी परीक्षा फी : 500 रुपये
- आरक्षित वर्गासाठी : 250 रुपये
- एकूण जमा झालेली परीक्षा शुल्क : 33 कोटी 39 लाख 45 हजार 250 रुपयेजिल्हा परिषदांकडे वर्ग केलेली परीक्षा शुल्क : 21 कोटी 70 लाख 64 हजार 413 रुपये
इतर महत्वाच्या बातम्या: