Marathwada Tehsildars Transfers : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच विभागातील शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या (Government Officer Transfer) केली जात आहे. विशेष म्हणजे महसूल विभागातील (Revenue Department) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यासोबतच आता तहसीलदारांच्या बदल्याचा (Tehsildars Transfers) देखील आदेश निघाला आहे. मराठवाड्यातील (Marathwada) आठही जिल्ह्यातील तब्बल 27 तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक अधिकारी बऱ्याच दिवसांपासून एकाच जिल्ह्यात कार्यरत होते. 


कोणाची कुठे बदली? 



  • छत्रपती संभाजीनगरच्या तेजस्विनी जाधव यांची बीड बदली 

  • वैशाली डोंगरजाल यांची देऊळगाव (जि. बुलडाणा) बदली

  • नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सोनाली जोंधळे यांची मंठ्याच्या तहसीलदार म्हणून बदली

  • सोयगाव येथील मोहनलाल हर्णे यांची शिरूर कासार (जि.बीड)  बदली

  • नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले वैभव विजय महिंद्रकर यांची धर्माबाद येथे बदली

  • परतूर येथून प्रतिभा गोरे-करंजकर यांची परभणी येथे बदली

  • रुपा चित्रक यांची संभाजीनगर बदली

  • पल्लवी टेमकर हिमायतनगर बदली

  • ज्योती चव्हाण धाराशिव बदली

  • राम बोरगावकर उदगिर बदली

  • उज्ज्वला पांगरकर हिंगोली बदली

  • हरीश गाडे औंढा नागनाथ बदली

  • धोंडीबा गायकवाड वाशी बदली

  • एस.एन हदेश्वर पाथरी बदली

  • मंजुषा भगत रेणापूर बदली

  • बिपिन पाटील नांदेड बदली

  • रामेश्वर गोरे कंधार बदली

  • काशिनाथ हनुमंतराव पाटील लोहार बदली

  • शिवानंद बिडवे छत्रपती संभाजीनगर बदली

  • प्रसाद कुलकर्णी निलंगा बदली

  • नर्सिंग जाधव चाकूर बदली

  • मनीषा मेने सोयगाव बदली

  • सुरेश घोळवे भोकर बदली

  • अश्विनी उमरे बदनापूर बदली

  • जी. आर. पेदेवाड- शिरूर अनंतपाळ बदली

  • प्रशांत थोरात उमरी बदली

  • सुजित नरहरी सोलापूर अशा बदल्या करण्यात आल्या आहेत. 


पोलीस दलातही मोठे फेरबदल...


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात देखील मोठे फेरबदल करत पोलीस महासंचालक, अप्पर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, पोलीस आयुक्त, सहआयुक्त, पोलीस अधीक्षक दर्जाच्या 64 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश निघाले आहेत. ज्यात, पुण्याचे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांची पोलीस महासंचालक पदावर बढती देत राज्याच्या गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) महासमादेशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रितेशकुमार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पुणे पोलीस आयुक्तपदी नागपूर शहरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, राज्याच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक रवींद्रकुमार सिंघल यांना नागपूर शहर पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्वच विभागात अशा बदल्या करण्यात आल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik Police : ग्रामीण पोलीस दलात खांदेपालट, 'इतक्या' अधिकाऱ्यांच्या बदल्या