Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद, जिल्हा प्रशासनाचे आदेश, काय आहे आदेश?
Sambhajinagar News : कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून राज्यभरात तीव्र आंदोलन (Maratha Andolan) करण्यात येत आहेत. मराठवाड्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याने कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर वगळता जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, पैठण, सोयगाव आदी ठिकाणी इंटरनेट सेवा बंद (Internet Closed) करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठीच्या आंदोलनाला (Maratha Reservation Agitation) आता काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना देखील समोर आल्या आहे. त्यामुळे कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर शहर वगळता गंगापूर, वैजापूर, खुलदाबाद, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, पैठण, सोयगाव आदी तालुक्यातील इंटरनेट सेवा 48 तासांसाठी बंद करण्यात आली आहे. फक्त संभाजीनगर शहरात इंटरनेट सेवा (Internet Service) सुरु राहणार असून मात्र कुठे काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. मात्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात याच आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे देखील समोर आलं आहे. त्यामुळे, या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागासाठी जमावबंदीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे, या काळात सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता इंटरनेट सेवांवर निर्बंध घालण्यात आला आहे. त्यानुसार आजपासून ते 03 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच 48 तासांपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. मात्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात याच आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे देखील समोर आलं आहे. त्यामुळे, या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागासाठी जमावबंदीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे, या काळात सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे.
इतर महत्वाची बातमी :
छत्रपती संभाजीनगर पोलीस आता ॲक्शन मोडवर; वेगवेगळ्या आंदोलनातील 32 लोकांवर गुन्हे दाखल