एक्स्प्लोर

Sambhaji Bhide : आंबेडकर अनुयायींच्या इशाऱ्यानंतर भिडे गुरुजींच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली, आयोजकांकडूनही सभा रद्द

Sambhaji Bhide in Aurangabad : संभाजी भिडे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा आंबेडकर अनुयायी यांच्याकडून देण्यात आला होता.

Sambhaji Bhide in Aurangabad : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंबेडकर अनुयायींच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी भिडे गुरुजींच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. तसंच आयोजकांकडूनही सभा रद्द करण्यात आली आहे. आज (20 जुलै) रोजी औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर येणार होते. तर याचवेळी ते गंगापूर येथे आयोजित कार्यक्रमाला देखील हजेरी लावणार होते.

संभाजी भिडे यांच्या याच दौऱ्याला आणि कार्यक्रमाला आंबेडकर अनुयायींनी विरोध केला होता. तसेच गंगापूर येथे होणाऱ्या संभाजीराव भिडे यांच्या कार्यक्रमाला परवनगी देऊ नये, अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत आंबेडकर अनुयायी आणि शहरवासियांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. तर आयोजकांकडूनही भिडेंचा कार्यक्रम आणि सभा रद्द करण्यात आली आहे. 

औरंगाबादच्या गंगापूर शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गंगापूर या संघटनेतर्फे आज सायंकाळी 5 वाजता राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र गंगापूर शहरात कार्यक्रम झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. देशाला व राष्ट्राला हानीकारक असणारे वक्तव्य करण्याचा हेतू आहे. त्यामुळे शहारातील आणि तालुक्यातील शांतता बिघडवण्याचे काम होण्याची दाट शक्यता असल्याचा दावा करत या कार्यक्रमाला परवानगी न देण्याचे निवेदन पोलिसांना देण्यात आले होते. तसेच हा कार्यक्रम झाल्यास सभा आणि संबंधित कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरपालिकेनेही शहरातील खांबांवर लावलेले पोस्टर्स, बॅनर्स काढून घेतले आहेत. 

आयोजकांकडूनही सभा रद्द

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गंगापूर या संघटनेतर्फे आज संभाजी भिडे यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यासाठी संपूर्ण तयारी देखील करण्यात आली होती. तर भिडे गुरुजींचा वेळ देखील घेण्यात आली होती. तर या कार्यक्रमाचे पोस्टर्स, बॅनर्स देखील संपूर्ण शहरात लावण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला, तसेच सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला. पोलिसांनी देखील या सर्व पार्श्वभूमीवर भिडे गुरुजी यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. त्यामुळे आयोजकांनी देखील एक पाऊल मागे घेत सभा रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. 

पोस्टर्स, बॅनर्स काढले...

संभाजी भिडे यांचा आज गंगापूर शहरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याने शहरातील अनेक भागात पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आले होते. भिडे यांचे स्वागत करणारे हे पोस्टर्स, बॅनर्स शहरातील मुख्य चौकात देखील लावण्यात आले होते. मात्र विनापरवानगी हे पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आल्याने स्थानिक प्रशासनाने ते काढून घेतले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Sambhaji Bhide in Aurangabad : संभाजी भिडेंच्या औरंगाबाद दौऱ्याला विरोध, आंबेडकर अनुयायींचा सभा उधळून लावण्याचा इशारा

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Embed widget