एक्स्प्लोर

Maharashtra Heat: उन्हापासून बचावासाठी काय काळजी घ्याल? आपत्ती व्यवस्थापनाकडून महत्त्वाच्या सूचना

Maharashtra Heat: उन्हाळ्यात नेमकं काय करावे आणि काय करु नये याबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने काही महत्त्वाचे आवाहन केले आहे. 

Maharashtra Heat: उन्हाळा सुरु झाला असून, ऊन्हाचा (Heat) चटका जाणवत आहे. तापमान देखील वाढताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दुपारच्यावेळी घराबाहेर पडणं देखील अवघड होते. विशेष म्हणजे अनेकदा उन्हाळ्यामध्ये उन्हापासून बचाव करण्यासाठी स्वतःची काळजी कशी घ्यावी याची बऱ्याच जणांना माहिती नसते. अशात चक्कर येणे, उष्माघात तसेच विविध आजाराची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात नेमकं काय करावे आणि काय करु नये याबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने काही महत्त्वाचे आवाहन केले आहे. 

उन्हाळ्यात काय करावे... 

1. पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. 

2. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.

3. दुपारी 12  ते 3 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.

4. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.

5. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.

6. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. 

7. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

8. उन्हात काम करत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.

9. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.

10. अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत आणि चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.

11. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.

12. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.

13. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.

14. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

15. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.

17. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.

18. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या @SDMAMaharashtra या ट्विटर, फेसबुक आमइ कू अॅपवरील सूचना पाहाव्यात.

19. जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचना पाहाव्यात.

16. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करत असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.

काय करु नये?

1. उन्हात अतिकष्टाची कामे करू नका.

2. दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.

3. दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.

4. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.

5. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.

6. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

7. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.

8. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे आणि खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.

इतर महत्वाच्या बातम्या: 

वाहन पकडल्यावर होणारे वाद टाळण्यासाठी 'हे' करा; वाहतूक पोलिसांनी सुचवले पर्याय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bopdev Ghat Incident: 20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
Pune Mahalakshmi Devi: दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
Sanjay Raut : जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
Dhammachakra Pravartan Din 2024 : दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maybach Car Kolhapur  : दसरा मेळाव्यासाठी छत्रपती घराण्याची मेबॅक कार सज्ज #abpमाझाSanjay Shirsat Mumbai : 'आता शुभ बोलं रे नार्या' असं बोलण्याची वेळ आलेली आहे - संजय शिरसाटSujay Vikhe Patil Bhagwangad : दसरा मेळावा राजकीय व्यासपीठ नाही; मुंडे साहेबांनी  सुरू केलेली परंपराSanjay Raut Full PC : डुप्लिकेट लोकंही दसरा मेळावा करतात -संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bopdev Ghat Incident: 20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
Pune Mahalakshmi Devi: दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
Sanjay Raut : जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
Dhammachakra Pravartan Din 2024 : दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
Raj Thackeray: राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
Mohan Bhagwat: OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
Ravindra Dhangekar : राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
Embed widget