एक्स्प्लोर

एकनाथ शिंदे संभाजीनगरच्या दौऱ्यावर, मराठवाड्यातील दृष्काळसदृश स्थितीवर होणार महत्त्वाची बैठक!

सध्या मराठवाड्या दुष्काळसदृश स्थिती आणखी गंभीर झाली आहे. गुरुना चारा मिळेनासा झाला आहे. अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातोय.

सध्या महाराष्ट्रात उन चांगलेच तापले आहे. मराठवाड्यात तर हा उकाडा चांगलाच वाढला आहे. उन्हामुळे लोक तर त्रस्त आहेतच पण पाळीव प्राण्यांचेही मोठे हाल होत आहेत. पाणवठे कोरडे पडले आहेत. विहिरींनाही सध्या पाणी नाही अशी सध्या मराठवाड्याची स्थिती आहे.  पावसाळा चालू व्हायला आणखी काही दिवस बाकी आहेत. अशा स्थिती मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थीत आणखी भीषण झाली आहे. मराठवाड्याची हीच स्थिती समजून घेण्यासाठी    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर आहेत. ते आज (23 मे) दुपारी तीन वाजता मराठवाड्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेणार. या दुष्काळासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक. या बैठकीला सर्व जिल्हाधिकारी, सर्व पालकमंत्री, कृषी अधिकारी महावितरणचे अधिकारी यासह अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. आज दुपारी 3 वाजता छत्रपती संभाजीनगर मधील विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची आणि भीषण पाणी टंचाईवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. या बैठकीत दुष्काळसदृश परीस्थितीचा आढावा घेऊन तत्काळ मदत कशी आणि कोणती करावी याचंदेखील नियोजन करण्यात येणार आहे. पाळीव प्राण्यांना लागणाऱ्या चाऱ्याचा पुरवठा कसा करावा,  या संदर्भातदेखील या बैठकीत चर्चा होणार आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
  राज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आहे. आगामी काळात ही स्थिती जास्तच गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्काळ मदत आणि उपायोजनांची गरज आहे. सध्या देशात लोकसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमुळे राज्यात सध्या आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे अशा स्थितीत मराठवाड्यासह इतर दुष्काळसदृश भागांना मदत करताना अडचणी येत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे खास विनंती केली आहे. राज्यातील काही भागातील दुष्काळसदृश स्थिती लक्षात घेता मदत करण्यासाठी, उपायोजना आखण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी, असं राज्य सरकारने निवडणूक आयोगाला म्हटलं आहे. सध्या महाराष्ट्रातील शेवटच्या पाचव्या आणि टप्प्यातील मतदान संपून दोन दिवस झाले आहेत, त्यामुळे आचारसंहितेत शिथिलता दिली जाऊ शकते, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. 
 
दरम्यान राज्य सरकारच्या या विनंतीवर निवडणूक आयोग विचार करत आहे. आज याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.  आचारसंहिता शिथील झाल्यास राज्य सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांना गती मिळणार आहे. 

हेही वाचा :

महाराष्ट्रात नवीन 224 महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित

चारा संपला, प्रश्न उभा ठाकला; जनावरांना जगवायचं कसं?

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News: 8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
Devendra Fadnavis Delimitation Bill: शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime News: 8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
Devendra Fadnavis Delimitation Bill: शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
Solapur Crime News: मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis: दक्षिणेच्या 75 खासदारांनी समर्थन दिलंय, शरद पवारांच्या पक्षाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पाठिंब्याबाबत स्पष्टच बोलले
दक्षिणेच्या 75 खासदारांनी समर्थन दिलंय, शरद पवारांच्या पक्षाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पाठिंब्याबाबत स्पष्टच बोलले
Delimitation bill Shivsena: भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
Delimitation bill Congress: पिक्चर अभी बाकी है ब्रो! डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी वेगवान हालचाली, काँग्रेस नेत्याचं सूचक ट्विट
पिक्चर अभी बाकी है ब्रो! डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी वेगवान हालचाली, काँग्रेस नेत्याचं सूचक ट्विट
Embed widget