छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाळूज परिसरातील चक्क ओपन स्पेसची जागा लाटण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात शिंदे गटाचे मंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांचं नाव नावं समोर येत आहे. औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणात स्थगितीचे आदेशही दिले आहेत. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) आणि राज्याचे मंत्री संदीपान भुमरे यांनी ही जागा इंडस्ट्रियल करण्यात यावी अशी मागणी केली होती. 


काय आहे नेमकं प्रकरण? 


शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आणि त्याचं कारण ठरलं आहे, ओपन स्पेसची जागा भुमरे यांच्याकडून लाटण्याचा प्रयत्न होत असलेले आरोप. संभाजीनगरच्या वाळूज भागातील आठ हजार स्क्वेअर फिटचा एक ओपन स्पेस आहे. हा ओपन स्पेस इंडस्ट्रियलमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी संभाजीनगरच्या दोन मंत्र्यांनी उद्योगमंत्रांना पत्र लिहिलं. त्यातील एक होते स्वतः पालकमंत्री संदिपान भुमरे आणि दुसरी होते केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड. एक हॉस्पिटल उभं करण्यासाठी हा ओपन स्पेस इंडस्ट्रियल करण्यात यावा असं  त्यांनी लिलेल्या पत्रात उल्लेख होता.


एक कॅबिनेट आणि दुसऱ्या केंद्रीय मंत्र्यांनी पत्र पाठवल्याने उद्योगमंत्र्यांनी देखील तत्परता दाखवत 8 हजार स्क्वेअर फिट पैकी पाच हजार स्क्वेअर फिटचा प्लॉट हा इंडस्ट्रियल केला. त्यासाठी  आर के रॉयल कंट्रोल आणि एल एल पी या कंपनीची मागणी आली. 


पण ज्या रुग्णालयाच्या मागणीसाठी ओपन स्पेसचा प्लॉट इंडस्ट्रियल करण्यात आला, तिथे आता मात्र वेअर हाऊस उभारणार असल्याचं या पत्रात लिहिलं गेलं आहे. त्यासाठी हा प्लॉट दोन्ही कंपन्यांना देण्यात आला. बरं हा झोल इथंच संपला नाही. ज्या आर के रॉयल कंट्रोल आणि एल एल पी कंपनीला ही जागा देण्यात आली त्या कंपनीने दिलेल्या माहितीत कॉन्टॅक्ट म्हणून चक्क मंत्री संदिपान भुमरे यांचा ई-मेल आयडी देण्यात आला आहे.


हा सर्व प्रकार समोर आल्यावर स्थानिक नागरिकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने देखील संदिपान भुमरे यांचाच हा प्लॉट हवा असल्याची टिपणीही केली. सोबतच या प्रकरणाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. 


सुरुवातीपासूनच हे सर्व प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात आहे. राज्यातील मंत्री संदिपान भुमरे आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड पत्र लिहितात काय, ज्या कंपनीला ही जागा मिळते त्या जागेवर भुमरेंचा ईमेल आयडी येतो कसा? धक्कादायक म्हणजे जी जागा रुग्णालयासाठी इंडस्ट्रियल करण्यात आली, त्यावर चक्क वेअर हाऊस उभा करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी होणं तेवढंच महत्त्वाचं आहे.


ही बातमी वाचा: