छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्यात एका तरुणाने छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस (Chhatrapati Sambhajinagar City Police) आयुक्तालयात प्रवेश करत थेट आयुक्तांची गाडी फोडली होती. ही घटना ताजी असतानाच आता त्याच ठिकाणी दोघांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. 


छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयातच दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना बघायला मिळाली. दरम्यान, हा सगळा प्रकार पोलिसांसमोरच झाल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली. या घटनेमुळे काही काळ पोलीस आयुक्त कार्यालयात गोंधळ निर्माण झाला होता. नागराज गायकवाड हे आपल्या शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते. तर, त्यांच्यासोबत ज्याचा वाद झाला ते व्यक्तीचारित्र्य प्रमाणपत्र काढण्यासाठी आले होते. दरम्यान, दोघांमध्ये वाद झाला आणि पुढे थेट हाणामारी सुरु झाली. पोलीसांनी मध्यस्थी करत हा प्रकार मिटवला. तर, विद्यापीठातील जुन्या वादावरून हा वाद झाला असल्याची माहिती मिळत आहे. 


एकच धावपळ...


छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयात नेहमी नागरिकांची वर्दळ असते. कोणी तक्रार, तर कोणी परवानगी अशा वेगवेगळ्या कामांसाठी पोलीस आयुक्त कार्यालयात येत असतात. दरम्यान, आज आरपीआयचे नागराज गायकवाड हे आपल्या शिष्टमंडळासह पोलीस आयुक्त यांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयात आले होते. त्यामुळे माध्यमांचे प्रतिनिधी देखील त्याठिकाणी उपस्थित होते. दरम्यान, याचवेळी तिथे एक व्यक्ती महिलेसोबत पोलीस आयुक्त कार्यालयात आपल्या एका कामासाठी आला होता. मात्र,  नागराज गायकवाड आणि त्याचे जुन्या वादातून आयुक्तालयातच वाद सुरु झाला. पाहता पाहता थेट हाणामारी सुरु झाली. अचानक झालेल्या हाणामारी एकच धावपळ उडाली. तर, उपस्थित असलेल्या पोलिसांनी वाद सोडवत त्यांना वेगळे केले. यावेळी एक पोलीस कर्मचारी धक्का लागल्याने खाली पडले. हा सर्व प्रकार माध्यमांच्या कैमरेत कैद झाला आहे.  


मागील आठवड्यात पोलीस आयुक्तांची गाडी फोडली होती...


गेल्या आठवड्यातच छत्रपती संभाजी नगर शहरातील पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्येच पोलिस आयुक्तांची गाडी फोडल्याने खळबळ उडाली होती. एका व्यक्तीने कार्यालयाची मुख्य काचेचा दरवाजा देखील फोडला होता. मस्के नावाचा व्यक्ती बॅगमध्ये दगड घेऊन पोलिस आयुक्तालयात आला. मुख्य दरवाजाची काच आणि आयुक्तांची गाडी त्याने यावेळी फोडली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार पोलीस पहारे देत असणाऱ्या पोलीस आयुक्तालयातच घडला. माझे गुन्हे नोंदवून घेत नाही, असा या व्यक्तीचा राग होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


वडील प्रेयसीसोबत, तर आई प्रियकरासोबत पळून गेली; तीन मुली वाऱ्यावर, शेजाऱ्यांकडून देखभाल