Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. एका मंदिराच्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर आधी दुचाकी घालण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर त्याची कॉलर धरून शिवीगाळ करत चापट बुक्याने मारहाण करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी पैठण पोलिसांत मारहाण करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवचंद भाउलाल गुनावत (वय 49वर्ष) असे मारहाण करण्यात आलेल्या पोलीस कर्मचारी यांचे नाव असून, ज्ञानेशर कापसे असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पैठण पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले देवचंद भाउलाल गुनावत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 21 जानेवारी रोजी ते सकाळी साडेनऊ वाजता पुत्रदा एकादशी निमित्ताने बंदोबस्त कामी खंडोबा मंदीराजवड बॅरीकेट डयुटीवर होते. गुनावत हे शासकीय गणवेशात कर्तव्य बजावत असतांना अरोपी याने मोटारसायकल घेउन गुनावत यांच्या अंगावर आला. त्यामुळे गुनावत यांनी कापसे यांना, 'तुम्ही तुमची मोटारसायकल पार्कीगला लावुन पायी जा असे सांगितले. याचाच राग आल्यावर 'तु मला ओळखत नाहीस का, मी कोण आहे असे म्हणुन कापसे यांनी गुनावत यांच्या गणवेशाची कॉलर धरून शिवीगाळ करून चापट बुक्याने मारहाण केली. तसेच, तुला नौकरी करू देत नाही अशी धमकी देउन शासकीय कर्तव्यात अडथळा आणला, असल्याचे गुनावत यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
यात्रेच्या मिरवणुकीत बोलावले नाही म्हणून मारहाण...
दुसऱ्या एका घटनेत यात्रेच्या मिरवणुकीत का बोलावलं नाही यावरून पाच ते सहा जणांनी एकाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत 39 वर्षीय फिर्यादी जखमी झाला आहे. या प्रकरणी सोयगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय रमेश सोनवने (वय 39 वर्ष, रा.सिंदोळा ता. सोयगाव) असे मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
विजय रमेश सोनवने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गावातील काशिनाथ बाबा यात्रेत असतांना निलेश नाना सोनवने यांनी गैरकायदयाची मंडळी जमवून माझ्या वडीलांना यात्रेच्या मिरवणुकीतका बोलावलं नाही असा जाब विचारला. तसेच याचाच राग आल्याने हातात लाकूड घेउन विजय सोनवने यांच्या उजव्या हातावर मारून करंगळी फॅक्चर केली. तसेच, विजय सोनवने यांच्यासोबत असलेल्या प्रभाकर यांना नाना दामू सोनवने यांनी दगडउजव्या पायाच्या पंज्यावर मारला. तसेच, भगावान बळिराम सोनवने यांनी सूनंदाबाई यांच्या नाकावर काठी मारून जखमी केले. तसेच, इतर आरोपींनी शिवीगाळ करून तूम्हाला पाहून घेतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
सूडाच्या भावनेतून भावकीतील महिलेने चिमुकल्या बहीण-भावाला संपवलं; उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजलं