औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेत (Aurangabad Municipal Corporation) अनेक बदल होत असूनm अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहे. दरम्यान आता असाच एक महत्वाचा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी घेतला आहे. यापुढे अंत्यविधी झाल्यावर आता स्मशानभूमीतच मृत्यू प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय टळणार असून, शासकीय कार्यालयात खेटा मारण्याची गरज राहणार नाही. 


औरंगाबाद शहरातील नागरीकांना मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यासाठी महानगरपालिका मुख्य कार्यालय आरोग्य विभागाअंतर्गत जन्म व मृत्यु नोंदणी विभाग (खिडकी) येथील स्मशान परवाना घेण्यासाठी अंदाजे 10 ते 12 किलोमीटर लांबून यावे लागत होते. यामुळे मोठी गैरसोय होत होती. दरम्यान नागरीकांची गैरसोय लक्षात घेता आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी नागरीकांच्या सोईसाठी प्रत्येक स्मशान भुमी, कब्रस्तानमध्येच अंत्यसंस्काराची परवानगी घेऊन अंत्यविधी झाल्यावर अंत्यविधी पत्र देण्याच्या निर्णय घेण्यात आलेला आहे.


महानगरपालिका मुख्य कार्यालयात येण्याची गरज नाही.


त्यामुळे यापुढे शहरातील नागरिकांनी 1 सेप्टेंबर 2023 पासून शहरातील स्मशान भुमी व कब्रस्तानमध्येच रितसर कागदपत्रांची पुर्तता करुन अंत्यसंस्काराची परवानगी घेऊन अंत्यविधी, दफनविधी झाल्यावर अंत्यविधी पत्र प्राप्त करुन घ्यावे. तर 31 ऑगस्ट पासून नागरीकांना अंत्यविधी परवानगीसाठी महानगरपालिका मुख्य कार्यालयात येण्याची गरज नाही. तसेच यापुढे जन्म-मृत्यु नोंदणी विभाग (खिडकी) मार्फत स्मशान परवाना दिला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 


तसेच अंत्यविधी, दफनविधीबाबत काही अडचण निर्माण झाल्यास त्या कार्यक्षेत्राच्या झोन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा. तसेच इतर समस्या निर्माण झाल्यास नागरिकांनी खालील कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहेत. यासाठी कार्यालय जन्म व मृत्यु नोंदणी शेख अश्फाक अहेमद 9766446741, अंकुश कैलास वाहूळ 9890090774, श्री. कैलास बाबुराव जाधव 9890564790 यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. 


नागरिकांची गैरसोय संपणार...


शहरातील अनेक भागात महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या स्मशान भुमी आणि कब्रस्तान आहेत. मात्र, स्मशान भुमी, कब्रस्तानमध्ये अंत्यविधी किंवा दफनविधी झालेल्या मृत्यू व्यक्तीची नोंद केली जायची. मात्र, संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना मृत्यू किंवा अंत्यविधी प्रमाणपत्र घेण्यासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात खेट्या माराव्या लागत होत्या. कधी अधिकारी मिळायचे किधी मिळत नव्हते. त्यामुळे शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात 10 ते 12 किलोमीटरचा फेरा मारून महानगरपालिका कार्यालय गाठावे लागायचं. मात्र, आता हा फेरा संपणार असून, ज्या भागातील स्मशान भुमी, कब्रस्तानमध्ये अंत्यविधी किंवा दफनविधी झाला तिथेच आता मृत्यू प्रमाणपत्र मिळणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Dog License : परवाना काढा, अन्यथा तुमचा महागडा श्वान जप्त होणार; दंडात्मक कारवाई देखील