Aurangabad Crime News : नामांकित सुपर मीटर मॅनेफॅक्चरींग कंपनीचे बनावट मीटर बनविणाऱ्याला औरंगाबाद (Aurangabad) शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपींकडून 208 मीटरसह इतर साहित्य असा सुमारे 5 लाख 50 हजार 400 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. मोहम्मद आजम अब्दुल रहेमान (वय 43, रा. मकबुल पार्क, नारेगाव मूळ रा. गल्ली नं. 7, भगतवाडी, जुनाशहर जि. अकोला) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोहम्मद आजम अब्दुल रहेमान याला 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. बेदरकर यांनी दिले आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुपर मिटर मॅनेफॅक्चरिंग कंपनीत भागीदार असलेले राजेश राजपिंताबर चिंता (वय 51, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर पुणे) यांची कंपनी रिक्षा आणि टॅक्सीच्या मिटरचे उत्पादन करते. त्यांचे कंपनीचे मिटर महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन विभागाने अधिकृत केलेले असून महाराष्ट्रासह, गुजरात, तेलंगणा, तामीळनाडू, केरळ, दिल्ली आणि इतर ठीकाणी कंपनीचे डिलर व सबडिलर्स आहेत. या कंपनीचे औरंगाबादच्या भोईवाडा पसिरात इम्रान खान नसीरखान हे डीलर असून त्यांचे बाय. एफ. खान मिटर सर्व्हिस नावाने, मिटर विक्री व दुरुस्तीचे अधिकृत दुकान आहे. इम्रान खान यांनी कंपनीला माहिती दिली की, आझम नावाचा व्यक्ती कंपनीच्या मिटरची हुबेहुबे कॉपी करुन ते बनावट मिटर कमी दरात विक्री करित आहे. 


दरम्यान या माहितीच्या आधारे कंपीनीने गुन्हे शाखेला तक्रार अर्ज दिला. त्यानंतर कंपनीचे डिलर इम्रान खान यांनी आरोपील आझमला 50 मिटर खरेदी करण्याच्या बहाण्याने मिटर घेवून बोलावले. ही माहिती गुन्हे शाखेला दिली. 8 जुलै रोजी आरोपी आझम हा 50 मिटर घेवून आला असता गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून आझमला बेड्या ठोकल्या. प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


हुबेहूब मीटर बनवला जायचा...


रिक्षाच्या मीटर बनवण्यात सुपर मिटर मॅनेफॅक्चरींग कंपनी नामांकित कंपनी समजली जाते. त्यामुळे रिक्षाचालक मीटर बसवताना या कंपनीला प्राधान्य देतात. दरम्यान हीच बाब लक्षात घेत मोहम्मद आजम अब्दुल रहेमान याने या कंपनीचे बनावट मीटर तयार केले. विशेष म्हणजे कोणालाही हे मीटर बनावट असल्याचे लक्षात येऊ नयेत म्हणून आरोपीने सुपर मिटर मॅनेफॅक्चरींग कंपनीकडून तयार करण्यात येणाऱ्या मीटरसारखा हुबेहूब मीटर तयार केला. पण हीच बाब कंपनीचे डिलर इम्रान खान यांच्या लक्षात आली आणि आरोपीचा भांडाफोड झाला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar: कुठे उद्योजकांमध्ये चोरांची भीती तर कुठे नशेखोरांमुळे व्यापारी हैराण; संभाजीनगरात नेमकं चाललं काय?