एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar News: मटणाचे पिस कमी वाढल्यावरुन वाद झाला, मित्रानेच केला मित्राचा घात

Chhatrapati Sambhaji Nagar : शेतात पार्टी करताना हा सर्व प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) सिल्लोड तालुक्यातील एका गावात विचित्र घटना समोर आली असून, मटणाचे पिस कमी वाढल्याने एका मित्राने दुसऱ्या मित्राची थेट हत्या केली आहे. शेतात पार्टी करताना हा सर्व प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आरोपी आणि मयत दोन्ही परप्रांतीय कामगार आहेत. जितेंद्र काशीराम धुरवे (वय 34 वर्षे, रा. हनुमंता टापू, ता. मुंडी, जि. खंडवा, मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे तर ओमजय जगदीश सुरेश रघुवंशी- ठाकूर (वय 35 वर्षे, रा. छोटी पोलिस लाइनजवळ, हरदा, मध्यप्रदेश) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील जितेंद्र धुर्वे व ओमजय जगदीश रघुवंशी हे दोघे मित्र आहेत. दोघेही सिल्लोड तालुक्यातील धारला येथील शेतकरी त्र्यंबक झाबू सोनवणे यांच्याकडे काही दिवसांपूर्वी  मोलमजुरीसाठी आले होते. त्यामुळे शेतात लावलेल्या मिरचीची राखण करणे व इतर कामे करण्यासाठी त्यांना शेतात सालदार म्हणून ठेवण्यात आले होते. दरम्यान या दोघांनी सोमवारी रात्री मटणाची पार्टी केली. मात्र, मटणाचे पिस कमी जास्त घेण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद सुरु असताना शेतकरी परसराम सोनवणे व त्र्यंबक सोनवणे यांनी समजूत घालून तो सोडविला. त्यानंतर दोघेही शेतकरी घरी गेले.

स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांचा वाद सोडवून घरी गेल्यावर, रात्री 11 वाजेदरम्यान पुन्हा या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी आरोपी ओमजयने जितेंद्रचे हातपाय तोडून त्याचा खून केला व शेजारी शेतात झोपून राहिला. सकाळी दूध काढण्यासाठी परसराम सोनवणे व त्र्यंबक सोनवणे शेतात आले असता, त्यांना जितेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी झोपलेल्या आरोपी ओमजयला विचारले असता, त्याने मीच त्याचा खून केल्याचे सांगितले. दरम्यान याची माहिती तात्काळ पोलीसांना देण्यात आली. तर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

खुनाचा गुन्हा दाखल

दरम्यान शेतकरी सोनवणे यांनी सिल्लोड पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोनि. सीताराम म्हेत्रे यांनी पथकासह धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तसेच आरोपी ओमजयला अटक करण्यात आली. तर पोलिसांनी मयत व आरोपींच्या कुटुंबीयांना माहिती दिली. रात्री उशिरा त्यांचे नातेवाईक सिल्लोड येथे हजर झाले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा दोन गटात राडा; पोलिसांकडून अफवा न पसरवण्याचे आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar On Tatoba|ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्लीत नवीन मुख्य प्रवेशद्वाराचं उदघाटनAaditya Thackeray Mumbai : नवी मुंबई विमानतळावरुन आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल #abpमाझाManoj Jarange Dasra Melava | जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडाला फुलांची सजावट, तयारी कशी?ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 11 Oct 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Arvind Kejriwal : फुकटातील रेवड्या अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
फुकटातील 'रेवड्या' अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Embed widget