चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातील ताडोबा (Tadoba) व्याघ्र प्रकल्प आपल्या नवनवीन प्रयोगांसाठी ओळखला जातो. ताडोबा व्याघ्र प्रकल्प आता एका नवीन प्रयोगासाठी सज्ज होतोय,आणि तो प्रयोग म्हणजे ताडोबाला देशातील पहिला प्रदूषण मुक्त व्याघ्र प्रकल्प करण्याचा.. टायगर सफारीसाठी ताडोबात पेट्रोलवर चालणाऱ्या जिप्सी वापरल्या जातात. मात्र आता टायगर सफारीसाठी इलेक्ट्रिक जिप्सी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सध्या बॅटरीवर चालणाऱ्या तीन जिप्सी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. या जिप्सींमुळे ताडोबा परिसर प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प ... आपल्या देशातीलच नाही तर जगभरातील पर्यटकांचं वाघ बघण्याचं आवडतं डेस्टीनेशन आहे. आधीच हिरव्या निसर्गामुळे ग्रीन असलेलं हे पर्यटन स्थळ आणखी ग्रीन होणार आहे.ग्रीन एनर्जी मुळे ... टायगर सफारीसाठी ताडोबात पेट्रोल वर चालणाऱ्या जिप्सी वापरल्या जातात. मात्र आता टायगर सफारी साठी बॅटरीवर चालणाऱ्या म्हणजेच इलेक्ट्रिक जिप्सी प्रयोगीय तत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जिप्सींमुळे ताडोबा परिसर प्रदूषणमुक्त
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सध्या बॅटरीवर चालणाऱ्या तीन जिप्सी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. या जिप्सींमुळे ताडोबा परिसर प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार आहे, सोबतच या जिप्सी अजिबात आवाज करत नसल्याने सफारी दरम्यान पशु-पक्ष्यांना अजिबात डिस्टर्ब होत नाही, पर्यटकांना त्यामुळे प्राणी अगदी जवळून पाहता येतात.
इलेक्ट्रिक जिप्सीमुळे फक्त 15 रुपयांच्या चार्जिंगमध्ये एक सफारी
सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या ताडोबाच्या एका सफारी साठी जिप्सी चालकांना किमान सहा ते सात लिटर पेट्रोलचा 700 ते 800 रुपये खर्च येतो पण आता इलेक्ट्रिक जिप्सीमुळे फक्त 15 रुपयांच्या चार्जिंगमध्ये एक सफारी करता येते. त्यामुळे जिप्सी चालक आणि पर्यटक इलेक्ट्रिक जिप्सींना जास्त प्रमाणात परवानगी देण्याची मागणी करत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प आपल्या नवनवीन प्रयोगांसाठी ओळखला जातो. इको-फ्रेंडली असलेल्या या इलेक्ट्रिक जिप्सींमुळे ताडोबाचं सौंदर्य आणखी खुलून येईल आणि पर्यटकांना निसर्गाचा जवळून अनुभव घेता येईल यात शंकाच नाही.
वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली
जगभरातील व्याघ्रप्रेमींना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कायम आकर्षिक करत राहिला आहे. शिवाय अलीकडच्या काळात ताडोबात वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
हे ही वाचा :