एक्स्प्लोर

निवडणुकीआधीच्या मेगाभरतीने भाजपची संस्कृती बिघडली, चंद्रकांत पाटील यांची कबुली

105 जागा जिंकल्यानंतरही भाजपला विरोधात बसावं लागल्याचं शल्य आहे. त्यात अनेक निष्ठावंतांना तिकीटं मिळाली नाही याचाही राग आहे. त्यामुळे खुद्द पक्षाध्यक्षांनीच मेगाभरतीला वाचा फोडल्याने भाजपमधला हा असंतोष कदाचित वाढीस लागण्याची शक्यता आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी झालेल्या मेगाभरतीने भाजपची संस्कृती बिघडली, अशी स्पष्ट कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. निवडणुकीच्या काळात बाहेरुन आलेल्या लोकांना संधी मिळाली. पण पक्षाच्या हृदयाजवळच्या लोकांना संधी मिळाली नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पक्षाच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते. भाजपची मेगाभरती ही चूक असल्याची कबुली आजपर्यंत भाजपच्या कुणीही दिली नव्हती. पण आता खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनीच कबुली दिल्याने भाजपमध्ये आयात झालेल्या लोकांचं काय होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. आधीच 105 जागा जिंकल्यानंतरही भाजपला विरोधात बसावं लागल्याचं शल्य आहे. त्यात अनेक निष्ठावंतांना तिकीटं मिळाली नाही याचाही राग आहे. त्यामुळे खुद्द पक्षाध्यक्षांनीच मेगाभरतीला वाचा फोडल्याने भाजपमधला हा असंतोष कदाचित वाढीस लागण्याची शक्यता आहे. दरम्यान मेगाभरतीसंदर्भात चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खोचक टीका केली आहे. या धक्क्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर भाजपला देवो अशा शब्दात त्यांनी टोला हाणला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या आधी माजी मंत्री राम शिंदे यांनी देखील राधाकृष्ण विखे पाटील आणि एकूणच झालेल्या इनकमिंगवर नाराजी व्यक्त केली होती. पक्षातील काही नेत्यांनी विरोधात काम केल्याचा आरोपही राम शिंदेंनी केला होता. या दिग्गजांनी केला भाजप प्रवेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस- राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.  फडणवीस मुख्यमंत्री असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील, साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले,  राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील बडे नेते, माजी मंत्री गणेश नाईक, मुंबईतील काँग्रेस नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह इंदापूरचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, साताऱ्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह, राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकरराव पिचड, त्यांचे पुत्र विद्यमान आमदार वैभव पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ, काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 October 2026: आज सर्वपित्री अमावस्येचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज सर्वपित्री अमावस्येचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Dattatray Bharane : आपलं पॅनेल 10 हजार मतांच्या लीडनं विजयी झालं पाहिजे, दादांच्या फोटोकडे पाहा, गमती जमती करु नका : दत्तात्रय भरणे
दादांचे आपल्यावर किती उपकार हे समोरच्या माणसाला कळायला पाहिजे होतं, दत्तात्रय भरणेंचा पुरुषोत्तम जगतापांना टोला
अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget