Chandrakant Patil, Solapur : मुस्लिम महिलांनी रांगा लावून पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) मतदान केले. कारण पीएम मोदींनी (PM MODI) तिहेरी तलाकचा कायदा रद्द केला. मुस्लिम महिला म्हणतात 'तलाक तलाक' असे म्हणून नवरा घराबाहेर काढायचा, पण ते आता होणार नाही. त्यामुळे महिला घराबाहेर येऊन मोदींना मतदान करतात, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. सोलापुरात महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. 


या मेळाव्याला चंद्रकांत पाटील, तानाजी सावंत, खासदार डॉ. जायसिद्धेश्वर शिवाचार्य,आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार यशवंत माने, आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते. 


चंद्रकांत पाटील म्हणाले, 55 वर्ष जे परिवार काँग्रेस सोबत राहिले ते उगीच सोडावे वाटले का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मिलींद देवरा आणि सर्वांनाच वाटतय की, देशाला एक नंबर न्यायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. इथे राहून विकास होणार नाही हे लक्षात आल्याने हे लोकं सोबत यायला लागले आहेत, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. 


'रोज आपपल्या गावात पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम करा'


बॅनरवर लहान फोटो लागला म्हणून नाराज होण्याची गरज नाही. रोज आपपल्या गावात पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम करा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात येणारं आहेत. जगातील सर्वात मोठे आश्चर्य सोलापुरात उभे राहत आहेत. आपण सर्वांनी जाऊन ते पाहिलं पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 


याची सुरुवात आडम मास्तर यांनी केली यांच्या घरी मी गेलो होतो. आडम मास्तर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पीएम मोदींचे इतके कौतुक केले की, मला वाटले आडम मास्तर यांना फडणवीस यांच्या प्रचाराला पाठवावे लागेल, असेही पाटील म्हणाले. 


पहिल्या दिवसासापासून पाणी, विज, चकककीत रस्ते, शाळा सगळं आहेत. येणाऱ्या लोकसभेत आपण 45 जागा निवडूण येतील असे म्हणतो. आपण 45 का म्हणतो तर हवेत चालायचे नसते. पण तुम्ही काम केलं तर 48 ही येतील, असा विश्वास चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केला. तुम्ही किती ही यात्रा काढा,मोदीजी विजयी होणारच आहेत. केवळ ते तुमच्यामुळे होतेत की नाही हे विचार करा, असा उपरोधित टोलाही चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींना लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


MLA disqualification Case : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर 16 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता, राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टात