Fighter Trailer: अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांचा बहुप्रतिक्षित फायटर (Fighter) हा चित्रपट 25 जानेवारीला चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. आता या चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन हृतिकनं फायटर या चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीज डेटची माहिती चाहत्यांना दिली आहे.


कधी रिलीज होणार 'फायटर' चा ट्रेलर? 


फायटर या चित्रपटाच्या या नवीन पोस्टरमध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर दिसत आहेत. या तिन्ही स्टार्सचे डोळे अभिमानाने भरलेले दिसतात. हे पोस्टर सोशल मीडियावर  शेअर  करुन हृतिक रोशनने ट्रेलर रिलीजची घोषणा केली आहे. हृतिकनं फायटर या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले की,"फायटरचा ट्रेलर 15 जानेवारीला दुपारी 12 वाजता रिलीज होणार आहे. चित्रपट 25 जानेवारी रोजी जगभरात रिलीज होत आहे. हा चित्रपट मोठ्या स्क्रीनवर IMAX 3D मध्ये पाहा."


नुकतेच फायटर या चित्रपटाचे 'हीर अस्मानी' थीम साँग रिलीज करण्यात आले आहे, जे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.या गाण्यातून हवाई दलाच्या सर्व वैमानिकांची त्यांच्या ध्येयाबद्दलची तळमळ स्पष्टपणे दिसून येते.






'फायटर' मधील कलाकारांच्या भूमिका


 सिद्धार्थ आनंदनं दिग्दर्शित केलेला फायटर हा चित्रपट  भारतीय वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांवर आधारित आहे, ज्यामध्ये हृतिक हा स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया ही भूमिका साकारणार आहे. तर दीपिका पदुकोण स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड उर्फ ​​मिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. अनिल कपूर हे या चित्रपटात कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. फायटर या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिक आणि हृतिक पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Fighter New Poster : 'फायटर'चं नवं पोस्टर आऊट! हृतिक, दीपिका अन् अनिल कपूरच्या लूकने वेधलं लक्ष