एक्स्प्लोर

गडकरींचं 'विकासकामात लोकप्रतिनिधींचा अडथळा' असल्याचं वक्तव्य भाजपच्या 'त्या' नेत्यासाठी, खैरेंचा रोख कुणाकडे?

परवा नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधींची शाळा घेतली होती. रस्त्यांच्या कामात मराठवाड्यातील लोकप्रतिनिधीचाच मोठा अडथळा असल्याचे ते बोलले होते. यावर आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील टीका केली आहे. गडकरींनी मला त्या नेत्याचे नाव सांगितले असून तो नेता प्रचंड भ्रष्टाचारी असल्याचा आरोप खैरेंनी केला आहे. खैरैंचा रोख भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याकडे असल्याची चर्चा आहे.

औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले होते. रस्त्यांच्या कामात मराठवाड्यातील लोकप्रतिनिधीचं मोठा अडथळा आहेत. कंत्राटदारांना कामाची टक्केवारी मागतात. अशा लोकप्रतिनिधीमुळं रस्त्यांच्या कामाचा दर्जा घसरलाय. रस्ते वेळेत पूर्ण होत नाहीत, अशी नाराजी गडकरी यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. या प्रकरणात माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उडी घेतली आहे. खैरे यांनी म्हटलं आहे की, गडकरींचं ते वाक्य भाजपच्या 'त्या' नेत्यांसाठी होते. ज्याने मराठवाड्यातील सर्व कंत्राट आपल्या नातेवाईकांच्या घेतली आहेत. त्या व्यक्तीने प्रसिद्ध राजूर गणपती संस्थानाची जमीन देखील हडप केली आहे. स्वतः गडकरी यांनी ते नाव आपल्याला सांगितले होते. जे सर्वांना माहीत असून स्वतः गडकरींनी ते नाव जाहीर करावे असे आवाहन देखील चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. खैरे यांचा रोख केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे असल्याची चर्चा आहे. खैरे म्हणाले की, माझ्याकडे एक कॅन्ट्रॅक्टर आला होता. कामामध्ये एक मोठा नेता त्रास देत आहे अशी तक्रार त्याने केली. मी त्याला गडकरींकडे घेऊन गेलो. गडकरींनी मला त्या व्यक्तीचं नाव सांगितलं. मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी देखील या विषयावर बोललो तर मुख्यमंत्री म्हणाले आता काय करणार? त्यांच्याच पक्षाचा ज्येष्ठ नेता अशी कामं करत होता. त्या नेत्याच्या जिल्ह्यातील कामं बघा. त्या कामांविरोधात अर्जून खोतकर यांनी देखील त्या नेत्याविरोधात आवाज उठवला.  त्या प्रसिद्ध व्यक्तिकडेच सगळी कामं गेली आणि त्या रस्त्याच्या कामांची दुर्दशा झाली आहे. तो नेता प्रचंड भ्रष्टाचारी आहे. अशा नेत्यांवर सीबीआयने छापे टाकावेत, असे ते म्हणाले. नितीन गडकरींनी मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केला होता. गंभीर बाब अशी की औरंगाबादच्या बैठकीत गडकरींना कंत्राटदारांनी थेट काही लोकप्रतिनिधींची नावचं सांगितली. नितीन गडकरी यांच्या समोर उस्मानाबाद जिल्ह्यातील 100 कोटींच्या एका रस्त्याचा विषय आला होता. कंत्राटदारांनं लोकप्रतिनिधी दोन टक्क्याप्रमाणं दोन कोटी मागत असल्याचा बैठकीत आरोप केला होता. इतकेच नव्हे पैसे दिल्याशिवाय कामच सुरू करू देत नाही, असं गडकरींना सांगितलं होतं. भाजप आमदार-खासदारांमध्ये जुंपली गंगापूरचे आमदार प्रशांत बंब हे ब्लॅकमेलर आहेत, असा आरोप नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केला. तर चिखलीकर भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केला होता. नांदेड जिल्ह्यातील पेनुर-शेवडी-सोनखेड या रस्त्याच्या कामावरुन भाजपच्या बंब आणि चिखलीकर यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde: सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
Horoscope Today 16 August 2026 : आज रविवारच्या दिवशी 'या' 6 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
आज रविवारच्या दिवशी 'या' 6 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! सूर्याचे पॉवरफुल संक्रमण नशीब पालटणार, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! सूर्याचे पॉवरफुल संक्रमण नशीब पालटणार, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget