एक्स्प्लोर

International Yoga Day 2022 : शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी योगसाधना उपयुक्त: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

योग प्रसार करणाऱ्या अनेक संस्थांकडून निस्वार्थीपणे, निःशुल्क प्रशिक्षण दिले जात आहे. नागरिकांनी शहरातील बगीचा, मैदानांवर दररोज सामूहिक योगसाधना करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले.

नागपूर : निरोगी आयुष्य जगण्यासाठी, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित योगसाधना करणे अत्यावश्यक आहे. याबाबतचा अनुभव आपण स्वतः गेल्या काही वर्षांपासून घेत असल्याचे  सांगून सर्वांनी आपल्या व्यस्तदिनक्रमातून वेळ काढून दररोज योग साधना करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कस्तुरचंद पार्क येथे आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार  प्रवीण दटके, विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी आर. विमला, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सदस्य अलोक, प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल, महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक एन. एल. येवतकर, जनार्धन स्वामी योगाभ्यास मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे, योगाचार्य भारतजी, सरोज गुप्ता यावेळी उपस्थित होत्या.

फोटो गॅलरीः नागपुरात 'योगा फार ह्युमॅनिटी'मध्ये हजारो साधकांनी केले योग प्रात्यक्षिक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरातील 75 ऐतिहासिक स्थळांवर केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. यामध्ये नागपूर येथील कार्यक्रमाचाही समावेश होता. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नागपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत यावेळी योगसाधना केली. 'योगा फॉर ह्युमॅनिटी' ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना होती.

योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये राष्ट्रसंघामध्ये 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार 2015 पासून अनेक देशांमध्ये योग दिवस साजरा होत असून योगसाधनेचे महत्व जगभरात पोहचण्यास मदत झाली आहे. विदेशात अनेक ठिकाणी योगशास्त्र शिकविले जावू लागले आहे. दररोज नियमित योगसाधना केल्याने आपल्याला शारीरिक, मानसिक संतुलन साधता येते, याचा अनुभव आपण स्वतः गेल्या काही वर्षांपासून घेत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

जीवनात समाधान, सुख प्राप्त करण्यासाठी नियमित योगसाधना करणे आवश्यक असल्याचे सांगून खांडवे यांनी जनार्धन स्वामी योगाभ्यास मंडळामार्फत योग प्रसारासाठी करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कर्नाटकातील मैसूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रसारण करण्यात आले. यावेळी त्यांनी देशवासियांना योगसाधनेचे महत्व सांगून नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. कस्तुरचंद पार्क येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महामेट्रोने नागरिकांसाठी नि:शुल्क मेट्रोसेवा उपलब्ध करून दिली होती. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या यंत्रणांचे अधिकारी कार्यक्रमात सहभागी झाले होते.

एक तास स्वतःसाठी द्याः गडकरी

दररोज किमान एक तास योगसाधना केल्यास आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकतो. आयुर्वेद, अॅलोपॅथी औषधोपचारापेक्षा योग साधना ही उपयुक्त असून त्यामुळे दवाखान्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. योगसाधनेतून जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, असेही गडकरी म्हणाले. योग प्रसार करणाऱ्या अनेक संस्थांकडून योगाचे निस्वार्थीपणे, निःशुल्क प्रशिक्षण दिले जात असून नागरिकांनी शहरातील बगीचा, मैदानांवर दररोज सामूहिक योगसाधना करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 20 August 2026: आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget