एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारात 'या' नेत्यांची वर्णी, तिन्ही पक्षाकडून नावं जवळपास निश्चित
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबर रोजी पार पडला. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त सापडत नव्हता. आता 30 तारखेला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार शपथ घेतील. यामध्ये अनेक दिग्गज तर काही नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
मुंबई : महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर फायनल झाली आहे. 30 डिसेंबरला दुपारी विधानभवन परिसरात एकूण 36 नवे मंत्री शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा कॅबिनेट मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त सापडत नव्हता. आता 30 तारखेला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार शपथ घेतील. यामध्ये अनेक दिग्गज तर काही नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीकडून संभाव्य नेते
अजित पवार
एनसीपीकडून सर्वात आघाडीवर नाव आहे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, प्रशासनावर चांगली पकड असलेला नेता, अनुभवी, राष्ट्रवादीच्या आमदारांवर चांगली पकड असलेला नेता अशी अजित पवारांची ओळख आहे. गृहमंत्री पद राष्ट्रवादीकडे येण्याची शक्यता आहे. अजित पवारांना गृहमंत्री पद मिळणे अवघड मानले जात आहे. सूत्रांच्या मते अजित पवारांना अर्थमंत्री पद मिळू शकते.
दिलीप वळसे पाटील
- माजी विधानसभा अध्यक्ष, संसदीय कामकाजाचा मोठा अनुभव, 15 वर्ष मंत्री म्हणून कामाचा अनुभव, शरद पवारांच्या अत्यंत जवळचे, शांत स्वभाव
हसन मुश्रीफ
- कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचं तगडं नेतृत्व, अल्पसंख्याक चेहरा
धनंजय मुंडे
अजित पवारांच्या जवळचे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता म्हणून चांगलं काम, चांगले वक्ते, पंकजा मुंडेंना पराभूत करुन नेतृत्व सिद्ध केलं.
अनिल देशमुख
- विदर्भातील राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री, शरद पवारांच्या जवळचे
नवाब मलिक
- मुंबईत पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली, कठिण काळात पक्षाची बाजू प्रवक्ता म्हणून चांगल्या पद्धतीनं सांभाळली, अल्पसंख्याक समाजाचा मोठा चेहरा
जितेंद्र आव्हाड
शरद पवारांच्या अत्यंत जवळचे, ठाणे आणि परिसरात नेतृत्व
राजेश टोपे
- माजी मंत्री, अजित पवारांच्या जवळचे
याशिवाय राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, बबनदादा शिंदे, सरोज अहिरे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संग्राम जगताप यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
काँग्रेसमधील संभाव्य नावं
अशोक चव्हाण
- राज्याचे माजी मुख्यमंत्री, सरकार चालवण्याचा अनुभव
पृथ्वीराज चव्हाण
- माजी मुख्यमंत्री, दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारमध्ये कामाचा अनुभव, उच्चशिक्षित
यशोमती ठाकूर
- काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, विदर्भातील फायरब्रॅंड नेत्या, महिला चेहरा
विश्वजित कदम
-महाराष्ट्रचे दिग्गज नेते पतंगराव कदम यांचे पुत्र, सहकार क्षेत्रात पकड, काँग्रेस कार्याध्यक्ष
विजय वडेट्टीवार
- विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून काही काळ काम, माजी मंत्री, विदर्भातील आक्रमक नेतृत्व
के.सी.पाडवी
काँग्रेस कार्याध्यक्ष, आदिवासी चेहरा
सतेज पाटील
माजी मंत्री, स्वच्छ प्रतिमा, भाजपला कोल्हापूरमध्ये मात देण्यासाठी मोठी भूमिका
वर्षा गायकवाड
- दलित चेहरा, माजी मंत्री
अमित देशमुख
- माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र, लातूरमध्ये पक्ष मजबूत केला
सुनील केदार
- विदर्भातील आक्रमक चेहरा, पार्टीचे ज्येष्ठ नेते
अमीन पटेल
- मुंबईतील अल्पसंख्यांक चेहरा
नसीम खान
- अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय, पार्टी हायकमांडकडे चांगलं वजन
प्रणिती शिंदे
-माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या, तिसऱ्यांदा आमदार, युवा महिला नेतृत्व
शिवसेनेचे संभाव्य मंत्री
शिवसेनेत क्षेत्रनिहाय मंत्रीपदं दिली जाणार असल्याची चर्चा आहे. यातील संभाव्य नावं
मुंबई :
अनिल परब
सुनिल प्रभू / रविंद्र वायकर / सुनिल राऊत
कोकण :-
उदय सामंत
वैभव नाईक / दिपक केसरकर
ठाणे :-
प्रताप सरनाईक
उत्तर महाराष्ट्र :-
सुहास कांदे/ दादा भुसे
गुलाबराव पाटील
पश्चिम महाराष्ट्र
तानाजी सावंत
शंभूराजे देसाई / प्रकाश आबिटकर
मराठवाडा
संदिपान भुमरे
अब्दुल सत्तार / संजय शिरसाट
विदर्भ
संजय राठोड
बच्चू कडू (प्रहार)
आशिष जैस्वाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भविष्य
निवडणूक
निवडणूक
Advertisement