एक्स्प्लोर

खासदार गेले असतील तर तोंड का लपवतायेत? जनतेच्या दरबारात त्यांचे काय हाल होतील सांगता येणार नाही, दानवेंचा हल्लाबोल 

ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. असं ऑपरेशन होण्याची शक्यता मला वाटत नसल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलं.

Ambadas Danve : ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. असं ऑपरेशन होण्याची शक्यता मला वाटत नसल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलं. जर खासदार गेले असतील तर तोंड लपवत का फिरतायेत? त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्ही गेलो. जनतेच्या दरबारात आल्यानंतर या खासदारांचे काय हाल होतील ते सांगता येणार नाही असा इशार देखील दानवे यांनी दिला. 

एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं स्पष्ट

चार वर्षानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला पक्षाचा व्हीप धुडकावून 6 खासदार अनुपस्थित राहिले. हे तेच 6 खासदार आहेत जे बंडखोरी करून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. या बैठकीला फक्त संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे चारच खासदार हजर होते. गैरहजर खासदारांना पक्षाने नोटीस पाठवली असून 7 दिवसांत उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. यावर दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही असे दानवे म्हणाले. 

शेतकऱ्यांना विनशर्त कर्जमाफी व्हायला पाहिजे : अंबादास दानवे

शेतकऱ्यांना विनशर्त कर्जमाफी व्हायला पाहिजे या मागणीसाठी आज मेहकर येथे उपविभागीय कार्यालयावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी म्हटलंय की ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. जर खासदार गेले असतील तर त्यांनी तोंड लपवून फिरू नये जनतेसमोर येऊन सांगावं की आम्ही हे केलं मग जनता त्यांचे काय हाल करतील हे सांगता येणार नाही अशी टीकाही त्यांनी या खासदारांवर केली.

Uddhav Thackeray On Operation Tiger : ठाकरेंचे ऑपरेशन तुडवा

त्याचवेळी फुटलेल्या 6 खासदारांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. आमच्या पक्षातून निवडून आलात तर आता राजीनामा द्या, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं. तर आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार असा इशाराही राऊतांनी दिला.

Shivsena Operation Tiger MP List : कोणते खासदार फुटल्याचा दावा?

1. संजय जाधव (परभणी)

2. संजय देशमुख (यवतमाळवाशिम)

3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)

4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)

5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)

6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget