Sant Gajanan Maharaj : राज्यभरातील संत गजानन महाराज भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील मोठं देवस्थान असलेल्या शेगांव येथील संत गजानन महाराज संस्थेमार्फत उभारण्यात आलेलं 'आनंद सागर' लवकरच भाविकांसाठी सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. " एबीपी माझा" ला मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन महिन्यात आनंद सागर सुरू होऊ शकतं अशी प्राथमिक माहिती आहे. 


संत गजानन महाराज संस्थांकडून 2001 साली सरकारकडून जमीन घेऊन त्यावर धार्मिक, आध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून "आनंद सागर" या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची 200 एकरवर उभारणी करण्यात आली होती. "आनंद सागर" मुळे शेगांव हे जगाच्या नकाशावर येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि पर्यटन वाढलं होत. अनेक भक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पर्यटनासाठी यायचे. पण, मध्यंतरी काही कारणामुळे शेगांव संस्थानाने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला.


लवकरच 'आनंद सागर' सुरु होणार 


आता "आनंद सागर" हे दीड ते दोन महिन्यांत भाविकांसाठी सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. "एबीपी माझा" ला मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन महिन्यात आनंद सागर सुरू होऊ शकतं त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या शेगांवातील बंद असलेल्या आनंद सागरच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटीचं काम संस्थानाच्या वतीने सुरु करण्यात आलं आहे. आता आगामी काही महिन्यात आनंद सागर सुरू होणार आहे.


सोशल मीडियावर संदेश व्हायरल


गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर शेगांवातील आनंद सागर पुन्हा सुरू करावे अशी मागणी भाविक करत होते, तसेच कधी सुरु करणार असा सवालही विचारण्यात येत होता. अशा आशयाचे संदेश देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. मात्र, याला आता पूर्णविराम देत आता काही महिन्यातच आनंद सागर पुन्हा भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे. 


आनंद सागरविषयी...


आनंद सागर हे शेगांव येथील मनोहारी उद्यान आणि ध्यान केंद्र आहे. हे केंद्र संत गजानन महाराज मंदिर ट्रस्टतर्फे सुमारे 200 एकर जमिनीवर शेगांव येथे येणाऱ्या भक्तांसाठी आध्यात्मिक आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित केलेले आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुविधा आहेत तसेच मत्यालय, तलाव, धान्यकेंद्र, फाऊंटन रेल्वेगाडी, झुलता पूल, तसेच तिथे ध्यान मंदिर आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Heat wave : देशात उष्णता वाढली, अनेक शहरात पारा 40 अंशाच्या पुढं; वाचा कोणत्या शहरात किती तापमान